परभणीच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी बौध्द वसतिमध्ये शांतता बैठक घेऊन भयभीत समाजाला विश्वास निर्माण करावा- नितीन सोनवणे

परभणीच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी बौध्द वसतिमध्ये शांतता बैठक घेऊन भयभीत समाजाला विश्वास निर्माण करावा- नितीन सोनवणे बीड ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी
परभणी प्रकरणी खालील प्रमुख मागण्या ,
1 संविधानाची विठंबना करणाऱ्या समाजकंठक आरोपीचे मास्टरमांइड अटक झाली पाहिजे.
2) पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी.
3) कलम 176 (1A) सीआरपीसी अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी.
4) न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधिशाकडून न करता सिटींग न्यायाधिशामार्फत करावी.
5) पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह इतर पोलीस अधिका-यांवर कलम ३२ अन्वये, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 3(1) आणि 3(2) प्रमाणे गुन्हे दाखल करावेत. सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. 
6) परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील तातडीने सीसीटीव्ही जप्त करून ते सीसीटिव्ही तपासावे.
7) सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने 1 कोटीची आर्थिक मदत जाहीर करावी.
8) सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तिस तातडीने शासकीय नोकरी देवून त्यांचे पुर्नवसन करावे.
9) वच्छलाबाई मानवते या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने 354, 307 अंतर्गत गुन्हे दाखल करुन त्यांना निलंबीत करावे.
10) च्छलाबाई मानवते यांना सरकारने १० लाख रुपयाची आर्थिक मदत करून त्यांचे पुर्नवसन करावे.
१1) न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वाचे पुन्हा एकदा न्यायाधिश यांच्या उपस्थितीत मेडीकल करावे.
१2) पोलिसांनी केलेल्या कोबींग कारवाईत बौध्द वस्तीतील लोकांच्या झालेल्या घरांची नुकसान भरपाई द्यावी. जिल्हा प्रशासनाने त्या सर्व घरांचे तातडीने पंचनामे करून घ्यावे.
१3) पोलिसांच्या कोबिंग कारवाईत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
१4) संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
१5) १० डिसेंबर २०२४ रोजी पार पडलेला सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजक यांची चौकशी करावी.) यासोबत त्या मोर्चातील सर्वांची भाषणे तपासून त्यांच्यावर कारवाई करावी.
16) संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या धरतीवर जी सी.आय.डी. आणी एस.आय.टी लावली ती सोमनाथ सुर्यवंशी यांच्या तपासासाठी लावावी.
 17 महिला व विद्यार्थ्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
18) महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावेत व सीसीटिव्ही बसविण्यात यावेत.
19 दलित (बौध्द) वस्तीत घुसून रिक्षा, मोटारसायकल, फोडताना पोलीसांचा व्हिडियो व्हायरल होतोय त्याची चौकशी करुन संबंधीतावर कार्यवाही झाली पाहिजे.
20) जिल्हाधिकाऱ्यांनी व पोलीस अधिक्षकांनी बौध्द वस्तीमध्ये शांतता बैठक घेवुन भयभीत समाजाला विश्वास निर्माण केला पाहिजे अशी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.



Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी