तडीपार औलादीनी डॉ.बाबासाहेबांसारख्या सूर्यावर थुंकू नये. काँग्रेस ने जिवंतपणी आणि बीजेपी ने मृत्यूपश्चात बाबासाहेबांची अहवेलना केली-डॉ.जितीन वंजारे


        महामानव विश्वरत्न बोधिसत्व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची अहव्हेलना होते,यांच्या पुतळ्यांची विटंबना होते, यांनी लिहिलेल्या घटनेचा अपमान होतो, राज्यघटना तोडली जाते, पुतळे प्रतिमा फोडल्या जातात, संविधान प्रतिकृतीची तोडफोड होते आणि ज्या संविधानाच्या जीवावर हा देश चालतो त्या संविधानाच्या संरक्षणासाठी कोणीही रस्त्यावर उतरत नाही,त्याचा आधार घेऊन सरपंच आमदार खासदार मंत्री संत्री झालेल्या फुकट्या औलादी काहीच बोलत नाहीत ही अतिशय अपमानास्पद गोष्ट आहे. भारताचा गृहमंत्री अतिशय खालच्या थराला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेण्यावरून आक्षेप नोंदवून आंबेडकर,आंबेडकर म्हणण्यापेक्षा देवाचे नाव घेतल्यास स्वर्ग प्राप्त होईल, इतक्या वेळेस देवाचं नाव घेतल्यास सात वेळेस स्वर्ग प्राप्त होईल अशी विटंबनापूर्वक बतावणी केल्याच्या निषेधार्थ सभागृहामध्ये आणि अखंड भारतामध्ये असंतोषाची लाट निर्माण झालेली आहे, त्या गृहमंत्र्याला मला सांगावस वाटत तू ज्या देवा बद्दल बोलतो आहेस त्याचा खटला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधाणामुळे लागला आहे. तू स्वतः तडीपार होता तुझ्या केसेसच्या खटल्याचे निराकरण करणारे कोर्ट जज आणि तू आत्ता बोलणाऱ्या संसद सभागृह हे पण त्याच बाबासाहेबांची कृपा आहे आणि म्हणून बाबासाहेबांना मानणाऱ्या आंबेडकरवादी समूहामध्ये, चळवळीला जागणाऱ्या तळागळातील लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून देशाच्या गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जे सभागृह संसद भारतीय राज्यघटनेवर चालते त्या राज्यघटनेचे घटनाकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव घेण्यावरून येथील गृहमंत्र्याला ऍलर्जी असल्याचं दिसून येत आहे. ज्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची ऍलर्जी आहे अश्या मनुवादी भामट्यानी राजीनामा द्यावा असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते मा.सम्राट डॉक्टर जितिन दादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे. आंबेडकरी समाज जशास तसे उत्तर देऊन बाबासाहेबांच्या अपमानाचा बदला घेऊ शकतो,राम नाम जप करायचाच असेल तर हिमालयात जाऊनसन्यास घेऊन देवत्व प्राप्त करावे, स्वर्गात जाऊन परत यावे इकडे संसदेमध्ये येऊन गृहमंत्री पद किंवा राजनीती मध्ये येऊन घाण करू नये,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करणे, त्यांच नाव घेण्यावरून ऍलर्जी निर्माण होणे म्हणजे सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष केल्यासारखा आहे, अशांना संसदेमध्ये बसण्याचा नैतिक अधिकार नाही.महामाहीम राष्ट्रपती आणि पंतप्रधान त्या संविधानापुढे झुकतात बाबासाहेबाना नमन करतात आणि हे स्वतः हुकूमशाही असल्यासारखे बोभाटपणे बाबासाहेबांची अहव्हेलना करतात हे चुकीचं आहे, जर तुम्हाला स्वर्गच प्राप्त करायचा आहे तर संन्यास घेऊन हिमालयामध्ये तपश्चर्या करावी, येथे येऊन स्वर्गाच्या बाता मारू नये आणि परमेश्वराचे नाव घेणाऱ्या किती लोकांना स्वर्ग भेटला आहे याची यादी गृहमंत्र्यांनी त्वरित जाहीर करावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चारित्र्य किंवा त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचल्यामुळे, त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे किती लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेले आहे, किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत,समानता, न्याय,बंधुता आणि स्वातंत्र्य मिळून अनेकांचे जीवन परिवर्तन होऊन पृथ्वीवरच स्वर्ग मिळवला असल्याच मी डॉ जितीन वंजारे सिद्ध करतो ते पण पुराव्याणीशी.तुमच्या सारख्या जुमलेबाज लोकांनी सूर्यसमान, विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, सूर्यासम तेज आणि वैभव असनाऱ्या महामानव, विश्वरत्न,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलू नये आपल्या गटार मुखातून टाकलेली थुंकी स्वतःच्याच मुखावर पडेल कारण सूर्यावर थुंकणारा अजून पैदा झाला नाही आणि ज्ञानाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना हरवणारा अजून जन्मला नाही. त्यामुळे स्वताची तडीपार बुद्धी,सत्तेचा अहंकारी माज, गहाण ठेवलेल्या बुद्धिहीन माणसाने देशाचं आणि जगातील सर्वोच्च संविधान लिहिणाऱ्या महामानवाच्या संबंधित भ्र शब्दही वाईट बोलू नये, त्यांच्या चुका किंवा त्यांना वाईट बोलण्याची तुमची लायकी नाही. तुम्हाला त्या पदावर आम्ही विराजमान केलेलं आहे, तुम्ही जनतेचे गुलाम आणि नौकर आहात.ह्या देशाचा मालक येथील सामान्य नागरिक आहे, तुम्ही नेते मंडळी नाहीत त्यामुळे तुम्हाला त्या पदावर आम्ही बसवू शकतो आणि उठवू पण शकतो. तुम्ही हुकूमशाहा असल्यागत वागू नये अस स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी मांडले आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता, आमचा जीव की प्राण आहे, त्यांनी दिलेलं संविधान आमची रक्त वाहिनी आहे आणि कायदे कलम आमचं रक्त आहे, त्याला धक्का लावलं तर याद राखा. एकदा जनतेने ठरवले तर भारताचा बांगलादेश होईल लक्षात असू द्या. द पॉवर ऑफ कॉमन मॅन.प्रधानमंत्री,गृहमंत्री, आणि सर्वच मंत्र्यांनी बहुमताचा कौल पाहून कानात अन नाकात वार शिरल्यागत भाषा करू नये, आंबेडकरी समाजाची ताकत ही चळवळीची ताकत आहे, शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांची ताकत आहे तिला ललकरू नका. बहुमत विकासासाठी दिल आहे इथे जातीयवाद, श्रेयवाद, प्रांतवाद,धर्मवाद करण्यासाठी किंवा हिंसाचार,दंगली पेटवण्या साठी किंवा हुकूमशाही करण्यासाठी दिले नाही.आपण लोकशाहीत वावरतो आहोत,त्याचा गैर वापर करू नका.
        काँगेस ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांना भरपूर त्रास दिला. मुंबई येथून बाबासाहेब पहिली निवडणूक लढले त्यात त्यांना काँग्रेस ने हरवले, काँग्रेस चे त्या काळचे मुंबई चे सर्वेसर्वा स. का. पाटील यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही असे जाहीर केले होते पण एन वेळेला नारायणराव काजरोळकर यांना उमेदवारी देऊन तब्बल चौदा हजार सातशे मतांनी हरवले होते, बाबासाहेब परत दुसऱ्यांदा निवडणुकीला उभे राहिले असता तेथेही काँग्रेस पक्षानेच डावपेच करून बाबासाहेबाना हरवले होते.बाबासाहेब कायदेमंत्री असताना महिला साठी संपत्ती समान हक्क, महिला आरक्षन, सतीप्रथा बंद, विधवा पुनरविवाह, तलाक बंदी,एक पत्नी धोरण,अपत्य धोरण, समान हक्क, श्री शिक्षण,दत्तक हक्क इत्यादी आठ प्रकारचे कायदे अस्तित्वात आणले होते पण त्याकाळी कट्टरपंथी, धर्मवादी संघटना आणि पक्षांनी विरोध केला आणि त्या काळचे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान नेहरू यांनी ते बिल नामंजूर केल यावर महिलांच्या हक्कासाठी आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठी हिंदू कोडं बिल सारख्या कायद्याचं पालन न केल्यामुळे बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला हा जगातील पहिला माणूस होता ज्याने स्री मुक्तीसाठी स्वतःच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला.काँगेस ने जिवंतपणी या महामानवाला कधीच भारतरत्न दिला नाही, त्यांना कायम कमी लेखल गेलं त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांना भारतरत्न दिला गेला.सांगायचं तात्पर्य काँगेस ने जिवंतपणी डॉ बाबासाहेब यांना त्रास दिला.त्यांची किंमत केली नाही आणि आजकाल बीजेपी त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांना त्रास देत आहे.त्यांची घृणा करत आहेत.बीजेपी आणि आर एस एस ह्या पक्ष संघटनांनी डॉ बाबासाहेबाना कधीच मानलं नाही, त्यांनी संविधानाला कायम विरोध केला, मनुस्मृती लागू करण्याच्या कायम हालचाली केल्या, हिंदूवाद जातीयवाद मंदिर मस्जित मुद्दा समोर करून सत्तेत येण्याचा कायम प्रयत्न केला. परंतु माफिविरांच्या अश्या गोष्टी कायम माफी मागून चिडीचूप झाले हाच त्यांचा इतिहास आहे. बाबासाहेबांच्या धर्म परिवर्तन वेळी सावरकर बोलला एक आंबेडकर गेल्याने काहीही फरक पडत नाही पण सावरकर हिंदू होते मग हिंदू धर्माचेच जगात सगळ्यात जास्त विभाजन का झाले ह्याच एकही कारण ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे बीजेपी आणि त्यांचे पक्ष पूर्वज कायम डॉ बाबासाहेबांच्या विरोधात होते हे उघड सत्य आहे आणि बीजेपी सरकार जेंव्हा जेव्हा येते तेंव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे फोडले जातात, दंगली घडवल्या जातात, संविधान बदलाच्या भाष्या केल्या जातात, संविधान फोडले जाते हे जाणून बुजून बीजेपी नेत्याकडून घडवल जातं ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हूणन सामाजिक कार्यकर्ते, राजकीय अभ्यासक तथा आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक दलित नेते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी स्पष्ट केले आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिवंतपणी काँग्रेस ने आणि मृत्यू पश्चात बीजेपी ने त्रास दिला त्यांची अहवेलना केली.
       अमित शाह यांना सांगू इच्छितो की आंबेडकर हे नाव फक्त फॅशन नसून ती पॅशन आहे, ते ब्रँड आहे, ते जोपर्यंत चंद्र तारे सूर्य वारे जल जमीन आकाश पाताळ असेल तो पर्यंत महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नाव कायम अजरामर राहणार तुमच्या सारख्याच्या येण्या जाण्याने त्यावर काहीच फरक पडणार नाही कारण तिथे त्रास झाला,अन्याय अत्याचार झाला, जिथे क्रांती व्हायची आहे, जिथे माणसाला माणूस म्हणून जगण्याच्या आर्त हाका मारल्या जातील, माणुसकी जिथे धोक्यात असेल तिथे आंबेडकर धावून जातील कारण जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर जास्त डेंजर असणार आहेत.जिथे आंदोलन, जिथे लोकशाही, जिथे क्रांती, जिथे चळवळ तिथे आंबेडकर हे समीकरण बाबासाहेबांच्या काळापासूनच आहे.त्यामुळे शहा यांनी शहाणं बनून आंबेडकरांची माफी मागावी, चुकलेल्या भाष्या दुरुस्त करून देश्याच्या सर्वोच्च सभागृहातील बाबासाहेबांचा सन्मान करावा, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर हे शब्द एकण्याची सवय लावावी,गुंडशाही आणि झुंडशाही ला आवर घालून हुकूमशाही बंद करावी. आपले संविधान कायम ठेवून संविधान कर्त्यांचा मान सन्मान राखावा अशी नम्र विनंती.... आपलाच मा.सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी