आंदोलनकर्ते यांना जिल्हाधिकारी, तहसिल कार्यालयाच्या आवारात निवारा शेड , पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था करा :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.१६ )बीड शहरातील शासकीय कार्यालये उदाहरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसिल कार्यालयाच्या नविन इमारतीच्या नियोजित आराखड्यात आंदोलनकर्ते यांना बसण्यासाठी जागा, निवारा शेड,पिण्याचे शुद्ध पाणी व स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी आणि बीड शहरातील बीड ते नगर रोड राष्ट्रीय महामार्गावरील रूंदीकरण दरम्यान नालीच्या कामासाठी शासकीय कार्यालयासमोरील संरक्षक भिंती आणि नगरपालिकेने बांधलेली स्वच्छतागृहे तोडण्यात आली त्यामुळे शासकीय कार्यालयात येणा-या नागरीकांची गैरसोय होत असुन नालीचे बांधकाम पूर्ण झालेल्या ठिकाणी तातडीने संरक्षक भिंत आणि स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत.अथवा लोकवर्गणीतून आंदोलनकर्त्यांना निवारा शेड बांधण्याची रितसर परवानगी देण्यात यावी अशी
मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर , माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन,शेख मुस्ताक यांनी शिवकुमार स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदनाद्वारे करत प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
आंदोलनकर्ते यांना नियोजित जागा, निवारा शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे याची सोय उपलब्ध करावी
बीड शहरातील नगररोड वरील जिल्हाधिकारी, तहसिल, पंचायत समिती, सामाजिक न्याय भवन शासकीय कार्यालये याठिकाणी आंदोलनकर्ते यांना निवारा असणारी मोठमोठाली झाडे जिल्हा प्रशासनामार्फत तोडण्यात आली असुन आंदोलनकर्ते यांचा निवारा हिरावला गेला आहे.तसेच नवनिर्माण जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय आवारात आंदोलनकर्ते यांच्यासाठी नियोजित जागा, निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करण्यात यावी.
बीड नगर रोड रस्ता रुंदीकरण दरम्यान तोडण्यात आलेली नगरपरिषदेची स्वच्छतागृहे तातडीने बांधण्यात यावीत.
---
बीड शहरातुन जाणा-या बीड ते नगर रोड राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण दरम्यान नाली बांधकामासाठी बीड शहरातील न्यायालय, तहसिल, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, पोलिस मुख्यालय आदि शासकीय कार्यालया समोरील नगरपरिषदेने बांधलेली स्वच्छतागृहे तोडण्यात आली असुन शासकीय कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या नागरीकांची गैरसोय होत असुन नाली बांधकाम झालेल्या ठिकाणी तातडीने स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत.
Comments
Post a Comment