चोरांचा मोर्चा शेतकऱ्यांच्या पिकांकडे ; मुळुकवाडी येथे रात्रीतुन ७४ कट्टे सोयाबीन चोरीला

चोरांचा मोर्चा शेतकऱ्यांच्या पिकांकडे ; मुळुकवाडी येथे रात्रीतुन ७४ कट्टे सोयाबीन चोरीला :- डॉ .गणेश ढवळे 
लिंबागणेश:- ( दि.१५ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश परीसरात चोरट्यांनी आता आपला मोर्चा शेतीमालाकडे वळवला असुन शेतातील कांदा पिक अथवा सोयाबीन रात्रीतुन चोरीला जाण्याचे प्रमाणात वाढ झाली असुन अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.त्यातच महावितरणच्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे चोरांचे साधत असुन याबद्दल तिव्र नाराजी शेतकऱ्यांमध्ये दिसुन येते.शेतातील पिक चोरी जाण्याबरोबरच घरासमोरील सोयाबीन चोरीला नेण्याचे धाडस चोरट्यांनी दाखवत पोलिस प्रशासनाला आव्हान दिले आहे.

मुळुकवाडी येथील शिवाजी व रामदास रंगनाथ ढास बंधुचे सोयाबीन चोरीला 
---
बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील अहमदपूर ते अहिल्यादेवी नगर राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजी रंगनाथ ढास आणि रामदास रंगनाथ ढास यांचे घरासमोरील सोयाबीनचे ७४ कट्टे रात्री चोरट्यांनी लंपास केले असुन एकुण जवळपास पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी महामार्गावरून सोयाबीन कट्टे न नेता घराच्या मागच्या बाजूला असलेल्या ज्वारीच्या शेतातुन डोक्यावर वाहुन पाठीमागे पिक अप मध्ये टाकुन लंपास केले आहे. पहाटे साडेतीन वाजता शिवाजी ढास लघवीला बाहेर आल्यानंतर त्यांना सोयाबीनचे कट्टे चोरीला गेल्याचे कळाले. त्यांचा मुलगा कैलास ढास यांनी पहाटे ४ वाजता नेकनुर पोलिस स्टेशन येथे जाऊन कल्पना दिली.तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून पेट्रोलिंगची गाडी विचारपूस करून गेली.व सकाळी १० वाजता लेखी तक्रार देण्यासाठी नेकनुर पोलिस स्टेशनला बोलावले असल्याचे कैलास शिवाजी ढास यांनी सांगितले.

महावितरणच्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे चोरीच्या घटना वाढल्या :- खंडु कदम, अमोल पितळे, कैलास ढास 
---
मूळुकवाडी गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असुन गेल्या ४ दिवसांपासून वीजपुरवठा नाही.घराच्या दारात सोयाबीन ठेवलेल्या ठिकाणी मोठा फोकस आहे.परंतु रात्री वीज नसल्याने चोरट्यांचे साधले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे खंडु ढास, अमोल पितळे, कैलास ढास यांनी सांगितले.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी