लिंबागणेश येथे अमित शहांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल असंविधानिक वक्तव्याचा निषेध
लिंबागणेश:- ( दि.१९ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवार रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत " डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन झाली आहे.आंबेडकरांच्या ऐवजी देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात जागा मिळाली असती" अशा प्रकारे असंविधानिक वक्तव्य करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला असुन यामुळे महमानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या असुन याचा निषेध करण्यासाठी आज दि.१९ गुरुवार रोजी लिंबागणेश येथील आंबेडकर समर्थकांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा हातात घेऊन गावातुन फेरी काढत " डॉ . बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही तर पशन आहे " अमित शहा माफी मागा" "अमित शहा राजीनामा द्या" " देश संविधानसे चलेगा " एकच साहेब बाबासाहेब"घोषणा दिल्या. यावेळी डॉ . गणेश ढवळे,उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ,दामु आण्णा थोरात, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, माजी उपसरपंच शंकर वाणी,भीम टायगर ग्रुप बीड जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ,आल इंडिया पँथर सेना उपजिल्हाध्यक्ष बीड आरूण निर्मळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश निर्मळ, विक्रांत वाणी, अँड.गणेश वाणी, लहु थोरात,रिंकु निर्मळ, विलास काटे, नामदेव अवसरे, चोखोबा निर्मळ, साहेबराव थोरात,पप्पू निर्मळ, नितीन थोरात, राजेंद्र थोरात,गणेश थोरात, माणिक थोरात, नितीन थोरात, प्रकाश निर्मळ, अमोल वक्ते, स्वप्निल वक्ते,राज निर्मळ,शहाजी वाणी,शंभु वाणी, रामदास निर्मळ, राजेंद्र निर्मळ,सोनु थोरात, नितेश निर्मळ, मल्हारी थोरात,कचरू निर्मळ,संदिप निर्मळ, स्वप्निल निर्मळ, स्वराज्य निर्मळ,बबन सोनावणे, बालाजी निर्मळ आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment