महापुरुषांच्या अनमोल उपदेशानुसार आपल्या जीवनाची वाटचाल हेच त्यांना खरे अभिवादन-प्रा. डॉ. उत्तमराव साळवे
महापुरुषांच्या अनमोल उपदेशानुसार आपल्या जीवनाची वाटचाल हेच त्यांना खरे अभिवादन-प्रा. डॉ. उत्तमराव साळवे
(महामानव अभिवादन ग्रुप तर्फे शालेय साहित्य वाटप शुभारंभ...)
बीड(प्रतिनिधी) आपल्या महाराष्ट्रात व देशात अनेक थोर महापुरुष होऊन गेले. त्यांच्या उपदेशानुसार आपल्या जीवनाची वाटचाल ठेवणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल असे अध्यक्षपदी लाभलेले प्रा. डॉ. उपप्राचार्य उत्तमराव साळवे यांनी प्रतिपादन केले. महामानव अभिवादन ग्रुपने इंदिरानगर येथे आयोजित केलेल्या सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांच्या ११२ व्या जयंती दिनी विनम्र अभिवादन कार्यक्रम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनी दानदात्याकडून मिळालेले शालेय साहित्य गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप प्रसंगी डॉ.भारती फूलेकर, बीड समता सैनिक दलांच्या कंपनी कमांडर सुजाता वासनिक व सेनि. केंद्रप्रमुख ए.एल. औसरमल एड. तेजस वडमारे विचार पिठावर प्रमुख उपस्थित होती तर अभिवादन ग्रुपचे डी.जि.वानखडे, कॅप्टन राजाभाऊ आठवले, के.एस. वाघमारे, प्रशांत वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम तथागतांच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प, पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष आयु. जी.एम.भोले सर यांनी केले तर सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले. शालेय साहित्य वाटप प्रसंगी 78 विद्यार्थ्यांना वही पेन - वाटप केले. याप्रसंगी *"सुटा बुटात शोभून दिसतो भीमराव एक नंबर"* हे बाबासाहेबांच्या जीवनावर सुस्राव्य गीत गाणाऱ्या प्रतिज्ञा घाडगे, धनश्री वालेकर यांना तर भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण करणाऱ्या स्वराली जावळे यांना बाबासाहेब नसते तर.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र व महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त महापुरुषांच्या जीवनाची माहिती पुस्तके वाचाल तर तर्फे मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्या डॉ.भारती फुलेकर यांनी पालकांशी व विद्यार्थ्यां सोबत संवाद साधताना सांगितले की, शिक्षणाचा हक्क नाकारलेल्यांना शिक्षणाकरता प्रथम शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शेण झेलले, तरी आता सद्य परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन थोड्याफार प्रमाणात आर्थिक सुस्थितीत असलेल्या शिक्षितांनी, व समाज बांधवांनी मागे राहिलेल्यांना तन - मन - धनाने मदत करणे गरजेचे आहे हे अनेक उदाहरणाद्वारे स्पष्ट केले व स्वतः तन-मन धनाने अशा प्रकारच्या उपक्रमास सहभागी होण्याचे ठोस आश्वासन दिले. सुजाता वासनिक यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर माहिती देऊन ते चैत्यभूमीचे शिल्पकार कसे आहेत हे सांगितले व *"गाव तेथे शाखा व घर तेथे समता सैनिक"* कसे गरजेचे आहे हे अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. पंडितराव चक्रे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अभिवादन ग्रुपचे बि.डी. तांगडे, आयु. गौतम जावळे, अशोक साळवे व जयश्री साळवे यांनी बहुमोल परिश्रम घेतले कार्यक्रमास आयु. जालिंदर बनसोडे, अर्जुन चक्रे, शितल जावळे, बेबी साळवे, सुमित्रा ससाने, लक्ष्मी वीर, रूपा खरात, कौशल्या घाडगे, सोनाबाई बनसोडे, छबुबाई साबळे, पिराजी वीर व बाबासाहेब सरवदे व परिसरातील बहुसंख्य महिला, पुरुषांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सरणयतयाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment