नाथ शिक्षण संस्था, परळी वै.अंतर्गत कार्यरत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी
दि.१२ डिसेंबर,२४
परळी वै.(प्रतिनिधी): नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय नामदार श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रेरणेने व सहसचिव श्री.प्रदीप खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, संस्थेअंतर्गत कार्यरत मिलिंद माध्यमिक विद्यालय,मिलिंद प्राथमिक विद्यालय, मिलिंद ज्युनियर कॉलेज,शारदा विद्यामंदिर, सौ.शारदाबाई गुरूलिंगअप्पा मेनककुदळे माध्यमिक विद्यालय,यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय,महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,चर्हाटा या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मिलिंद माध्यमिक विद्यालयात लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक श्री.कदरकर सर,पर्यवेक्षक श्री.धायगुडे सर यांच्या सस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कदरकर सर या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करत असताना म्हणाले, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य उपेक्षित,कष्टकरी, शेतकरी,शेतमजूर,कामगार अशा गोरगरीब वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी खर्च केले.अठरापगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन समाजकारण व राजकारण केले. शेतकरी,कष्टकरी वर्गाबरोबरच राज्याच्या औद्योगिक आणि व्यावसायिक उत्कर्षासाठी ते आयुष्यभर धरपडत राहिले. राज्याच्या राजकारणाला त्यांनी एक नवीन दिशा देण्याचे मोलाचे कार्य केले.
नाथ शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत सर्व शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक,प्राचार्य, जेष्ठ सहशिक्षकांनी स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आप-आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये अभिवादन कार्यक्रम प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षक,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Comments
Post a Comment