बीड जिल्ह्यात ११ महिन्यात १७४ शेतकरी आत्महत्या मात्र मदत केवळ ६५ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना १०९ कुटुंबिय मदतीपासून वंचित ; जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नाही ; मुख्यमंत्र्यांना तक्रार :- डॉ.गणेश ढवळे



बीड:- ( दि.१७ ) निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकत नसलेली शेती आणि वाढते कर्ज आत्महत्येचे प्रमुख कारण मानले जाते.शेतकऱ्यांना कधी नापिकी,कधी मालाला भाव नाही तर कधी पिकांवर पडणारी रोगराई तर कधी अतिवृष्टी यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडुन नैराश्येपोटी आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊस उचललं जात आहे.मागील १ जानेवारी २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या ११ महिन्याच्या कालावधीत बीड जिल्ह्यात १७४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. प्रशासनाकडे नोंद असलेल्या १७४ शेतकरी आत्महत्यांपैकी मदतीस पात्र १०५ तर अपात्र १७ तर प्रलंबित ५२ असुन केवळ ६५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून १ लाख रूपयांची शासकीय मदत मिळाली आहे असुन १०८ कुटुंबीय मदतीपासून वंचित आहेत.संबधित प्रकरणात प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढुन उर्वरित आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना केली आहे.

बीड जिल्हा प्रशासनाकडे शासन दरबारी ११ महिन्यांत १७४ शेतकरी आत्महत्यांची नोंद 

१ जानेवारी २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान शेतकरी आत्महत्यांची शासन दरबारी नोंद खालील प्रमाणे आहे. एकुण १७४ शेतकरी आत्महत्या,पात्र १०५ , अपात्र १७ , प्रलंबित ५२ आणि मदत ६५ अशी नोंद आहे. जानेवारी महिन्यात १८ आत्महत्या त्यापैकी १४ पात्र ४ अपात्र, प्रलंबित ० ,मदत १४ तर फेब्रुवारी महिन्यात १४आत्महत्या पैकी १२ पात्र, अपात्र २, प्रलंबित ०,मदत १२ तसेच मार्च महिन्यात १२ आत्महत्या पैकी १२ पात्र अपात्र ०, प्रलंबित ०,मदत १२ तसेच एप्रिल महिन्यात आत्महत्या १३ पैकी पात्र १२ , अपात्र १ , प्रलंबित ०,मदत ९ तसेच मे महिन्यात १३ शेतकरी आत्महत्या पैकी पात्र १२ , अपात्र १ , प्रलंबित ० ,मदत ०३ तसेच जुन महिन्यात २९ आत्महत्या, पात्र २३ , अपात्र ०५ , प्रलंबित ०१ ,मदत १३ तसेच जुलै महिन्यात १४ आत्महत्या पैकी पात्र ०८ , अपात्र ०३ , प्रलंबित ०३ ,मदत ०२ तसेच ऑगस्ट महिन्यात १४ आत्महत्या पैकी पात्र ०५, अपात्र ०१, प्रलंबित ०८ ,मदत ०० तसेच सप्टेंबर महिन्यात १५ आत्महत्या पैकी ०७ पात्र, अपात्र ०, प्रलंबित ०८ ,मदत ० तसेच ऑक्टोबर महिन्यात ०९ आत्महत्या पैकी पात्र ०, अपात्र ० , प्रलंबित ०९ मदत ० तसेच नोव्हेंबर महिन्यात २३ आत्महत्या पैकी पात्र ० , अपात्र ०, प्रलंबित २३ मदत ० एकुण ११ महिन्यांत १७४ शेतकरी आत्महत्यांची नोंद असुन त्यापैकी १०५ मदतीस पात्र,१७ अपात्र तर ५२ प्रलंबित आणि ६५ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे.

 शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उपाययोजना प्रभावहीन :- डॉ.गणेश ढवळे 

राज्य सरकारकडुन नैसर्गिक संकट आणि ईतर समस्यांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळावा. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी म्हणून पिक विमा,नुकसानीचे अनुदान, विविध योजना, हमीभाव आदि उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी आत्महत्येचे सत्र थांबताना दिसुन येत नाही. सरकारच्या उपाययोजना प्रभावहीन असल्याचे दिसून येते.शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिली जाणारी १ लाख रुपयांची मदत सुद्धा वेळेवर दिली जात नाही हे अतिशय खेदजनक असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिली.

जिल्हा प्रशासना कागदी घोडे नाचवण्यातच व्यस्त त्यांना शेतकरी आत्महत्यांचे गांभीर्य नाही :- डॉ.गणेश ढवळे 
--
७ ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले होते.त्याअनुषंगाने दि.१० ऑक्टोबर रोजी नरेंद्र कुलकर्णी तहसीलदार महसूल -२ जिल्हा दंडाधिकारी कार्यालय बीड यांनी आंदोलनाच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्ती विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना निवेदनातील नमुद मुद्यांबाबत नियमानुसार उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाही बाबत अर्जदार यांना अवगत करावे असे लेखी पत्रक काढले मात्र ऑक्टोबर महिन्यात ०९ आणि नोव्हेंबर महिन्यात २३ शेतकरी आत्महत्या होऊन दोन्ही महिन्यांतील एकुण ३२ प्रकरणे प्रलंबित आहेत.त्यामुळे एकंदरीतच जिल्हा प्रशासनाला शेतकरी आत्महत्यांचे गांभीर्य नसुन केवळ कागदी घोडे नाचवण्यात प्रशासन मग्न असल्याची संतापजनक प्रतिक्रिया डॉ.गणेश ढवळे यांनी दिली आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी