गढी ग्रामपंयायत कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
बीड (सखाराम पोहिकर ) आज दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी गढी ग्रामपंचायत कार्यालय येथे पंचायत समिती गेवराई यांच्यावतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कार्यक्रम 2024 - 25 आमचा गाव आमचा विकास यांचे प्रशिक्षण गढी ग्रामपंचायत येथे ठेवण्यात आले होते यावेळी प्रशिक्षक म्हणून आलेले मा . पवार साहेब व काकडे सर यांचा गढी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच विष्णूपंत घोगडे व उपसरपंच राजू पठाण यांनी सत्कार केला यावेळी मा काकडे साहेब मा पवार साहेब मा घोलप साहेब व सरपंच विष्णूपंत घोगडे यांनी येत्या 5 वर्षामधील आराखडा कसा तयार करायचा व गावातील समस्याचे निवारणासाठीचा आराखडा यांवर मार्गदर्शन केले यावेळी रांजणी ग्रामपंचायतचे सरपंच आसाराम रोडगे सरपंच बळीभाऊ चव्हाण खांडवीचे सरपंच गोपाळ शिंदे सरपंच बाळू उपसरपंच राजू पठाण उगलमुगले मिरकाळा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जवरे साहेब गढी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री घोलप साहेब पशुवैद्यकीयचे गढीचे डॉक्टर तसेच विविध गावचे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आशासेविका अंगणवाडी शिक्षिका आणि विविध कर्मचारी प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन गढी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी घोलप यांनी केले तर आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार गढी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णूपंत घोगडे यांनी मानले तेव्हा या कार्यक्रमाला आलेल्या प्रशिक्षणार्थीची गढी ग्रामपंचायतच्यावतीने चहा नाष्टाची सोय गढी ग्रामपंचायतीच्या कर्मचारी यांनी व्यवस्थितपणे सोय केली
Comments
Post a Comment