परभणीतील संविधान फोडणाऱ्या औलादीच्या करवत्या धनीला फाशी द्या- डॉ जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी /- काल परवा परभणी येथे महामानव विश्वरत्न बोधिसत्व घटनाकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृती एका विकृत माणसाने फोडली, यावरून परभणीत दंगल उसळली त्या निमित्ताने डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांचे सवाल 1)परभणीतील माथेफिरूने संविधान फोडन्या ऐवजी हागनदारीतला गु का खाल्ला नाही? आणखी दुसरं वेगळं कृत्य केल्याचे आढळून आलं नाही?मग इतकंच करताना त्याच माथ फिरलं काय? पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालत आहे काय? हे कृत्य कोणीतरी करायला लावल्याने त्याचा करवता मास्टर माईंड शोधा आणि त्याला फाशी द्या अशी मागणी दलित नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केली आहे.
2)माथेफिरूचा माथा फिरला असताना त्याचे मेंटल हेल्थ सर्टिफिकेट कुठे आहे? पोलिसांनी त्यांना कोणत्या अटीवर माथेफिरू मानलं? पोलिसांचा गृह खात्याचा दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे की रोकण्याचा प्रयत्न आहे? त्याची वैद्यकीय तपासणी न करताच त्याला माथेफिरू का घोषित केल? त्याने इतर महापुरुष पुतळे, घरे, गार्डन, गाड्या,शासकीय मालमत्ता, खाजगी मलमत्ता याचे नुकसान केल्याचे पुरावे आहेत का? भारताचे सर्वोच्च संविधान फोडण्याचं किळसवान कृत्य केल असताना पोलीस प्रशासन त्याला माथेफिरू हा टॅग देऊन दंगल उसाळत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे? कारण घडलेल्या गुन्ह्याची तपासाची दिशा पालटून उलट आंबेडकरी समाजातील गोरगरीब जनतेवर जुलूम अन्याय अत्याचार लाठीचार्ज मारझोड करून कोंबिग ऑपेरेशन चालवून तेथील निष्पाप आंबेडकरी जनतेला त्रास देत आहेत. हे वेळीच थांबवा नसता महाराष्ट्र पेटेल ही आग सर्वीकडे लागेल. हे वेळीच थांबवा.
3)कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा कोणीही कायदा हातात घेऊ नये. पण घडलेल्या गुन्हेगाराला फाशीच झाली पाहिजे त्याला देशद्रोही घोषित करून त्याचा बोलावता करवता बाप पकडून असल्या नालायक औलादी भर चौकात फाशी देऊन मारल्या पाहिजेत. संविधान ही दलित शोषित पीडिताची रक्तवाहिनी आहे, न्याय देवता आहे,समता बंधुता,स्वातंत्र्य, न्याय सौर्वभौम अबाधित राहील पाहिजे मग असं करणाराला फाशीच झाली पाहिजे भारतात महामानव विश्वरत्न, बोधिसत्व घटनाकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीच पुतळे, संविधान माथेफिरू कडून का जाळले आणि फोडले जातात? बाबासाहेबांचीच विटंबना का केली जाते.? महाराष्टात आणि भारतात असं करणाऱ्या किती लोकांवर फाशी किंवा देशद्रोहाचे गुन्हे तुम्ही यापूर्वी दाखल केलेत? यांचे माथे फिरल्यावर इतर महापुरुषांची विटंबना हे माथेफिरू करताना दिसत नाहीत मग जाणून बुजून हे स्वयंघोषित किंवा पोलीस प्रशासन घोषित केलेले माथेफिरू कोणाच्या तरी सांगण्यावरून हे असले घाणेरडे कृत्य करत असावेत त्यांचा बाप शोधा. ही आंबेडकरी जनता आहे एकावेळेस बापाला, आजोबाला कोणी काही बोललं तरी सहन करू पण बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या संविधानाकडे वाकडी नजर कराल तर हेच केल जाईल. आंबेडकरी जनतेची ताकत अजमावू नका. शेरदिल नवजवान अक्खा भारत पेटवतील त्यांच्या रागाचे कारण बनू नका. द्याना त्या आरोपीला फाशी त्याला ठेऊन आणखी कोणाचे तरी पुतळे फोडायचे आहेत काय? त्याचे पाठीराखे कोण आहेत? त्या माथेफिरू भडव्याचे कॉल रेकॉर्ड तपासा त्याला भरीस कोण घालत आहे, तो कोणत्या पक्ष किंवा संघटनेशी बांधील आहे का? त्याचा वैचारिक आणि सामाजिक वावर तपासा त्याची कुंडली काढा आणि त्याला फाशी द्या. परत कोणी माई का लाल संविधानाकडे वाकडी नजर करणार नाही ह्याची खबरदारी घ्या.
4)निवडणुकी पुरता संविधान आणि बाबासाहेबांचा फोटो वापरणाऱ्या खैस औलादी आता का रस्त्यावर येईनात. प्रत्येक पक्ष बाबासाहेबांचा फोटो वापरतो मग संविधान फोडलं असताना का एकही पक्ष संघटना किंवा बौद्धशिवाय रस्त्यावर आला नाही?पक्ष संघटना इतर जातींचे लोक का येईनात? संविधानाला वाचवण्याची जबाबदारी फक्त आंबेडकरी समाजाचीच आहे का.? फक्त बौद्धाचीच आहे का? नक्कीच नाही तुम्ही सगळे संविधानानेच सेफ आहात ना?आरक्षण पाहिजे मग आरक्षणाची तरतूद करणारा बाप नको का? भडव्यानो संविधान आहे म्हणून सेफ आहात मग त्याची तोडफोड करायले असताना संविधान वाचावा म्हणणारे बांगड्या घालून आत का बसले आहेत? रॅली काढून दलित मतांसाठी संविधान वाचवू पाहणाऱ्या खोटारड्या औलादी कोणत्या बिळात बसल्यात. तुम्ही जरी बसले असले तरी क्रांतीचे रक्त आमच्या शरीरात आहे तोपर्यंत आम्ही संघर्ष करू. आम्ही संविधान वाचवू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.
5)कोम्बिंग ऑपरेशन च्या नावाखाली पोलिसांनी धर् पकड चालू केलेली दिसते आहे. आमचा तुम्हाला इशारा आहे निपक्षपाती तपास करा गुन्हा करणारच बाप शोधा, तुमचा बाप गुन्ह्यात असल्यासारखा तपास करू नका विनाकारण आंबेडकरी जनतेला दिसला निळा रुमाल की मारझोड करू नका. जरी तुम्ही परभणीत करत असाल तरी अखंड भारताच्या नजरा तुमच्यावर आहेत तुम्ही तपास काय करता, दलितांना किती मारता बौद्ध समाजाची घर उध्वस्त करता हे आम्ही पाहत आहोत. असं समजू नका तेथील आंबेडकरी जनतेवर आता जुलूम करू. त्यांच्यावरी गुन्हे तात्काळ मागे घ्या. नाहक त्यांना मारू नका. मागे पळून मारायला तुमच्या घरची भाकरी त्यांनी चोरली नाही. ते चोर नाहीत ते तुफानातील दिवे आहेत, ते बाबासाहेबांच्या क्रांतीने पेटलेल्या भूमितील भूमिपुत्र आहेत त्यांच्या संतापाच कारण शोधा. आणि योग्य न्याय द्या. नसता आंबेडकरी समाज इतका उद्रेक करेल की त्याचा अंत काढणं मुश्किल होईल. आंबेकरी वस्त्यावर जाऊन गोर गरीब, म्हातारे, बेसहारे, महिला तरुण यांना टार्गेट करण सोडून द्या. दंगल रोका. कायद्याचं पालन करा. शांतता राखा संयमान घ्या सत्तेचे गुलाम बनून जुलूम सहन केला जाणार नाही एव्हढच.
महाराष्ट्र अशांत करून आपली पोळी भाजून घेणाऱ्या संघटना पक्ष किंवा विकृतीना इशारा आहे सत्ता येते जाते पक्ष संघटना येतात जातात पण हा महाराष्ट्र आणि देश वाचला पाहिजे. समता, शांतता आणि न्याय, बंधुता टिकली पाहिजे.असं कृत्य करणाऱ्या विकृतीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे परखड विचार सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरकर यांनी मांडले.
Comments
Post a Comment