शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व परभणी येथील भीमसैनिकावरील गुन्हे परत घेण्याची केली मागणी
*शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जयदीप कवाडे यांनी घेतली भेट*
23 डिसेंबर रोजी परभणी येथे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्य कुटुंबीयांची सांत्वन भेट घेणार
नागपूर प्रतिनिधी - परभणी येथील झालेल्या संविधान प्रतिकृती विटंबना,तसेच तुरूंगा मध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यु ची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाने 50 लाखाची आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरीत घेण्यात यावे अशी अग्रही मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळा चे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप भाई कवाडे यांनी आज नागपुर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
परभणी येथे 10 डिसेंबर ला सायं 5 वाजता जातीयवादी मानसिकता असलेल्या एकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेचे प्रतिकृती ची विटंबना केली असून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या निंदनीय घटनेबाबत आंबेडकरी समाजा मध्ये तीव्र असंतोष उफळून आलेला आहे. तसेच आंदोलना मध्ये अटक झालेले भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा तुरूंगा मध्ये झालेला मृत्यु ची सखोल चौकशी करण्यात यावी.
परभणी येथे या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी जनता न्याय मागन्यासाठी रसत्यावर उत्तरली. परभणी बंद च्या आंदोलनात 100 हुन अधिक आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.
निवेदना मार्फ़त आपल्याला महाराष्ट्रतील तमाम आंबेडकरी जनते च्या वतीने अशी आग्रही मागणी केली. परभणी येथील झालेल्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व आंबेडकरी कार्यकर्त्यांवर जे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे ती मागे घेण्यात यावी तसेच पोलिसांनी सुरु केलेले कॉम्बिंग ऑप्रेशन लगेच थांबवण्यात यावे या मागणीसाठी भेट घेऊन निवेदन देऊन कारवाई करण्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे मराठवाडा महासचिव तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त अनिल तुरुकमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments
Post a Comment