लिंबागणेश येथील श्रीकृष्ण मंदिरात मोठ्या उत्साहात श्रीदत्त जयंती साजरी
लिंबागणेश:- ( दि.१४ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील श्रीकृष्ण मंदिरात विश्वस्तांनी आज दि.१४ शनिवार रोजी दत्त जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्रीदत्तात्रेयसह लक्ष्मी नारायणाची पुजा करण्यात आली. यावेळी चौरंगावर पांढरे वस्त्र टाकुन त्यावर दत्तात्रेय महाराजांची मुर्तीची स्थापना करण्यात येऊन पंचामृताने दत्तात्रेयाचा अभिषेक करण्यात आला.धुप, दिवा, फुलं, नैवेद्य अर्पण करत आरती करण्यात आली.हिंदु धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे.मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षातील पोर्णिमेला दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. दुपारी १२ ते १ दरम्यान महाआरती, भजन, किर्तन व दुपारी १ ते ५ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बाळुकाका पाटोदकर, बंडु पाटोदकर,राजेभाऊ गिरे, विनायक वाणी,रामकिसन गिरे, सुदाम रणखांब, जयदेव गिरे,अंकुश गिरे, अर्जुन गिरे,उमेश जोगदंड आदिंनी परीश्रम घेतले.
Comments
Post a Comment