मतदानाचा हक्क बजावताना शाळा, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते , स्मशानभूमी आदी मुलभूत सुविधांसाठी उमेदवारांना जाब विचारावा:- डॉ.गणेश ढवळे

 

लिंबागणेश:- ( दि.९ ) विकसित भारतासाठी मतदान हे आवश्यक असुन मतदान जनजागृती काळाची गरज असुन महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २०२४ निमित्ताने " उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा" या महाराष्ट्र शासनाच्या विशेष अभियानात सहभागी व्हावे यासाठी सर्वच मतदारांनी आवर्जून मतदान करावे.ग्रामस्थांनी मतदान प्रक्रियेतील महत्व आणि त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मताचा टक्का वाढवा आणि मतदान आपला अधिकार आणि आपली जबाबदारी असुन याची जाणीव मतदारांना व्हावी.लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामस्थांनी गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर बॅनर लाऊन मतदानाचा हक्क बजावा आणि हक्क बजावताना शाळा, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, स्मशानभूमी सारख्या मुलभूत सुविधांसाठी मतदान मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना जाब विचारावा आणि.धर्म, जात पात,लिंग,भेद, विसरून मुलभूत सुविधांसाठी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे.

धर्म,जात पात,लिंग भेद विसरून शाळा , आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, स्मशानभूमी आदी.मुलभुत सुविधांसाठी उमेदवारांना जाब विचारावा:- डॉ.गणेश ढवळे 

मतदान आपला अधिकार आणि आपली जबाबदारी याची जाणीव ठेवून मतदान करताना निकोप आणि सुदृढ लोकशाहीसाठी धर्म,जात पात,लिंग भेद विसरून आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आणि स्मशानभूमी सारख्या मुलभूत प्रश्नांच्या अनुषंगाने मतदान मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना जाब विचारावा आणि निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी केले.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी