सेक्युलर पणाचा "आव" आणणारे "जयदत्त" शेवटी संघ परिवाराचेच - नितीन जायभाये
( सेक्युलर कार्यकर्त्यांच्या जीवावर अनेक वर्ष सत्ता भोगणाऱ्या क्षीरसागरांनी अखेर धर्मनिरपेक्षेतेचा केला खून)
बीड प्रतिनिधी - नेहमी सेक्युलर पणाचा आव आणणाऱ्या क्षीरसागरांनी शेवटी जनतेचा विश्वासघात केलाच. जयदत्त क्षीरसागरांनी संघ-भाजपाच्या विचारसरणीला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचे खरे रूपदर्शन आज जनतेला होत आहे. सेक्युलर कार्यकर्त्यांच्या जीवावर आयुष्यभर सत्ता व मोठी मोठी पदे, मंत्रीपदे भोगणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी अखेर सेक्युलर विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात करून, समृद्ध विचारांच्या महाराष्ट्र राज्याचे वाटोळे करणाऱ्या भाजपा-संघाच्या विचारसरणीच्या दावणीला जाणे पसंत केले आहे. जयदत्त क्षीरसागर ने जरी पाठिंबा दिला असला तरी बीडचे सुजाण नागरिक त्या पाठिंब्याला स्वीकारणार नाहीत. सत्ता मिळवण्यासाठी व सत्तेतून पैसा मिळवण्यासाठी हे क्षीरसागर कुटुंबीय कुठल्याही थराला जाऊ शकतात तसेच काहीही करू शकतात हे परत एकदा त्यांनी दाखवून दिलेले आहे. क्षीरसागर कुटुंबीयांनी गेल्या अनेक दिवसांपासून नाटकीय राजकारण चालवलेले आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी आधी अपक्ष फॉर्म भरला व "अण्णा की बहुत हवा आहे, अण्णा आमदार होने वाले है अण्णा मंत्री बनेंगे" अशा प्रकारची जुमलेबाजी करून कार्यकर्त्यांचा संच गोळा करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांचा संच जुळवल्यानंतर अचानक त्यांनी अनपेक्षितपणे अपक्ष फॉर्म मागे घेतला. यातूनच त्यांचा "परिवारवाद" व पुतणे प्रेम झाकून राहिलेले नाही. काहीही झालं तरी सत्ता घरातच राहिली पाहिजे, त्यासाठी सर्व क्षीरसागर "एकच" आहेत, सत्तेसाठी हापापपलेल्या क्षीरसागरांची ही सत्ता मोही वृत्ती सर्व जनतेला दिसत आहे. कार्यकर्ते, त्यांची विचारसरणी, त्यांच्या भागातील अडीअडचणी, त्यांच्यामुळेच बीड मतदार संघातील ग्रामीण भागाची व बीड शहराची झालेली दुरावस्था, त्यांनीच अफाट कर्जात बुडवलेली नगरपालिका, लोकांचे चाललेले हाल या सर्व गोष्टींची त्यांना काहीही कदर नाही त्यांना फक्त कुठल्याही मार्गाने सत्ता व पैसा पाहिजे. आणि सत्तेसाठी काहीही या विचारांचे क्षीरसागर कुटुंबीय आहेत हे अनेक वर्षापासून बीडची जनता पहात आलेली आहे. सत्तेसाठी व सत्तेतून मिळणाऱ्या पैशासाठी अनेक युक्त्या करून जनतेची प्रत्येक निवडणुकीला फसवणूक करणाऱ्या क्षीरसागर कुटुंबीयांना, जागा झालेला मतदार 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये क्षीरसागर कुटुंबाची पैसा व सत्तेची नशा उतरवल्याशिवाय राहणार नाही. बीड शहरातील जनता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये योग्य पात्रता असलेला जनतेच्या सर्वांगीण विकासाचे व हिताचे निर्णय घेणारा दूरदृष्टी असलेला पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त व सुसूत्रता बुद्ध कारभार आणणारा निस्वार्थ उमेदवार आमदार म्हणून निवडून देतील याची मला पूर्ण खात्री आहे.
चौकट
माझ्या समस्त भावंडांंनो बहिणींनो माय- मावश्या माऊल्यांनो सप्रेम नमस्कार,
मी श्री. नितीन मदनराव जायभाये सकलं ओबीसी सकलं बहुजन सकलं मुस्लिम सकलं एससी/ एसटी समाजाच्या न्याय हक्कासाठी बीड विधानसभेच्या रिंगणात उतरलेलो आहे. तीन माणसांचा समुह" नागरिक" असे माझे चिन्ह आहे. पारदर्शक,भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था व व्यवस्थेतील पारदर्शक ,सुसूत्रताबद्ध ,भ्रष्टाचारमुक्त कारभार
तसेच जनतेच्या हिताचे व सर्वांगीण विकासाचे निर्णय हेच माझे ध्येय आहे . ते पूर्ण करण्यासाठी मी सर्वकाळ तत्पर, कार्यशील राहून जागरूकपणे कार्यरत राहील असे अभिवचन सर्वांना देतो. तरी येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी माझ्या अनुक्रमांक 21 "नागरिक"( तीन माणसांचा समूह) या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे विनम्र आवाहन मी सर्व मतदार बंधू भगिनींना करत आहे.
Comments
Post a Comment