सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार संघर्ष समिती संघटनेचा वर्धापन दिनानिमित्त उपस्थित रहा- डॉ जितीन वंजारे


     बीड प्रतिनिधी:-सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार संघर्ष समिती संघटनेचा आज वर्धापन दिनानिमित्त व सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे यांच्या पुतणीचा श्रीशा नितीन वंजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त सर्व पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आव्हाहन डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे. हा कार्यक्रम पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार, स्नेहसंमेलण आणि स्नेहभोजन कार्यक्रम होणार असून आज दिनांक आठ नोव्हेंबर सायंकाळी सात वाजता हॉटेल गोल्डन चॉईस बार्शी रोड बीड येथे होणार असून आपण सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार संघर्ष समिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.
          सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांना कोणतेही मानधन मिळत नाही, त्यांना विशेष सरकारी योजनेचे लाभ दिले जातं नाहीत, त्यांच्या हातून गोर गरिबांची सेवा होते, देश सेवा घडते पण त्यांना मदतीचा हात कोणी देत नाही. नेते स्वतःचे पोट भरण्यासाठी काम करतात पण एक सच्चा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अविरत पणे गोर गरिबांची सेवा करतात त्यांच्यावर सरकारी दबाव आणून वेगवेगळ्या केसेस मध्ये त्यांना अटकवलं जातं, त्यांना मागे खेचल जातं पण आता घाबरायची गरज नाही, संस्थापक अध्यक्ष डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी या संघटनेच्या मार्फत सामाजिक कार्यकर्ता व पत्रकारांचं जाळ विनून मोठी ताकत त्यांच्या मागे उभी करणार असल्याच म्हटले आहे. पत्रकार हा भारताचा आणि लोकशाही देशांचा चौथा आधारस्तंभ आहे तो वाचला पाहिजे,त्याला बळ दिल पाहिजे ह्या हेतूने आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभ राहून त्यांच्यावर होणाऱ्या खोट्या केसेस, मानहानी, दबाव, हाणमार,राजकीय दबाव तंत्र वापरून त्यांना त्रास दिला जातो हे थांबवण्यासाठीच माझी संघटना काम करेल पण संघटना बळकटी साठी आपण सर्वांनी काम करावे असे आव्हाहन डॉ जितीन वंजारे यांनी केले आहे. कार्यक्रम सायंकाळी सात वाजता आज दिनांक 08 नोव्हेंबर 2024 ला होणार आहे तरी सर्व पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी हॉटेल गोल्डन चॉईस येथे उपस्थित राहावे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी