केज राखीव मतदार संघाच्या विकासाचे चक्र फिरवण्यासाठी अपक्ष उमेदवार वैभव स्वामींना मिळाले ग्रामोफोन चिन्ह


बीड प्रतिनिधी 
232 केज अनुसूचित जाती राखीव मतदार संघातून अपक्ष उमेदवार पत्रकार वैभव स्वामी यांना निवडणूक आयोगाकडून ग्रामोफोन चिन्ह मिळाले आहे. ग्रामोफोन प्रमाणे विकासाचे चक्र केज मतदार संघामध्ये फिरवण्यासाठी जागरूक आणि वंचित मतदारांनी साथ द्यावी असे आवाहन अपक्ष उमेदवार वैभव स्वामी यांनी केले आहे.
232 केज राखीव मतदार संघामधून अपक्ष उमेदवार वैभव स्वामी उभे आहेत. एक उच्चशिक्षित बीएससी, एलएलबी, मास्टर ऑफ जर्नालिझम झालेले आहे. ते केज मतदार संघातील क्रांतिकारी येळंबघाट या गावचे मूळ रहिवासी आहेत. मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाल्यानंतर 1952 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत केज मतदार संघाचे पहिले आमदार होण्याचा मान याच गावातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी रामलिंग स्वामी यांना मिळाला. तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक, विकासाची दृष्टी लाभलेले उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे त्या काळातील रामलिंग स्वामी होय. आज त्यांचा नातू पत्रकार अँड वैभव स्वामी हे अपक्ष म्हणून 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये केज मतदार संघामधून उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत. या मतदारसंघातील विद्यमान भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामान्य मतदारांचा देखील प्रचंड संताप आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा देखील अनुभव केज मतदार संघातील जाणकार मतदारांनी अनुभवलेला आहे. त्यामुळे तिसरा सक्षम पर्याय म्हणून आज केज मतदार संघातील बुद्धिवंत मतदार, जागृक मतदार, विकासापासून वंचित राहिलेला मतदार, उपेक्षित मतदार हा अपक्ष उमेदवार वैभव स्वामी यांच्याकडे सहानुभूतीने पाहत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1877 मध्ये संगीत, संवाद क्षेत्रात ज्या उपकरणाने क्रांती केली तो ग्रामोफोन हाती घेऊन अविकसित केज मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अपक्ष उमेदवार वैभव स्वामी यांनी ग्रामोफोन हाती घेतला आहे. त्यामुळे मतदारांमधून वैभव स्वामी आणि त्यांना मिळालेले चिन्ह ग्रामोफोन चमत्कार घडवेल आणि धक्कादायक निकाल समोर आणेल. त्यामुळेच सामान्य मतदार मनातून म्हणत आहेत कहो दिल से स्वामी फिरसे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी