हतबल व गोरगरीब जनतेला "वाचवा"!धन दांडग्यांना परत परत मते देऊ नका! - नितीन जायभाये

 



सकल ओबीसी व सकल बहुजनांचे अपक्ष उमेदवार नितीन जायभाये यांचे जनतेला कळकळीचे आवाहन!

बीड प्रतिनिधी - गरीब मरतोय या देशात एक नवीन पांढरपेशी, विकृत कट्टरवादी, लबाड धनदांडग्याची व्यवस्था निर्माण होत आहे व जाणीवपूर्वक निर्माण केली जात आहे. विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समृद्ध संविधानाला काही ना काही युक्त्या करून संपवायचे- बदलवायचे आणि या देशातील जनतेला धनदांडग्यांचे गुलाम करायचे, अशी एकाधिकारशाही व भांडवलदारशाही व्यवस्था निर्माण करण्याचे काम चालू आहे. हे सर्व लोक कट्टरपंथी विकृत व निर्दयी आहेत यांना गोरगरीब जनतेचे काहीही देणे- घेणे नाही त्यांना फक्त त्यांच्यासाठी काम करणारे व मेहनत करणारे गुलाम पाहिजेत. हुकूमशाही व्यवस्थेचे ते समर्थक आहेत. त्याच दिशेने देशाला ते घेऊन जात आहेत. माझ्या भावंडांनो भगिनींनो माय माऊल्यांनो जागे व्हा जागे राहा, रात्र वैऱ्याचीच आहे. जागृतपणे, विचारपूर्वक योग्य माणसालाच मतदान करा. पांढरपेशी धनदांडग्यांनी उभे केलेल्या व गुलामगिरीची व्यवस्था निर्माण करू पाहणाऱ्या उमेदवारांना मतदान करू नका हे नम्र आवाहन मी आपल्या सर्वांना करत आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी