प्रास्थापिता विरोधात असणाऱ्या सर्वसामान्य शेख मंजूर यांना विजयी करा-ॲड.प्रकाश आंबेडकर

वंचित आघाडीच्या सभेला माजलगावात अभूतपूर्व प्रतिसाद.

माजलगाव प्रतिनिधी दि.10

माजलगाव विधानसभेची निवडणूक ही प्रस्तापित विरोधात एका सामान्य कुटुंबातील
असणारा तरुण शेख मंजूर लढवत आहे.वंचित आघाडीच्या या दलित वंचित उपेक्षित मुस्लिम बहुजन घटकातील समाज बांधवांनी विजयी करावे असे आवाहन एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा माजी खासदार एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की,माजलगाव मतदार संघातील सत्ता ही कायम एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर अशा घराणेशाहीत विभागल्या गेली आहे.वंचित आघाडीने एका सामान्य कार्यकर्त्याला शेख मंजूर यांच्या रूपाने उमेदवारी दिली आहे.
विकासाची दूरदृष्टी असणारा हा युवक आपणा सर्वांना परिचित आहे.मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासा करिता अल्पसंख्यांक असणाऱ्या या उमेदवाराच्या पाठीशी साथ आणि समर्थन द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही आरक्षणाच्या विरोधात आहेत असेही ते त्यावेळी म्हणाले. आरक्षण म्हणजे मानसन्मान आहे तो कायम टिकवायचा असेल तर विधानसभेत जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार पाठवा असे मत आयोजित सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले.ते माजलगाव येथे वंचीत बहुजन आघाडी चे उमेदवार शेख यांच्या प्रचार सभेत बोलत होते.ओबीसी नेतृत्वाला संधी दिली यांची देखील पोलखोल करत आरक्षण हे धोक्यात आणण्याचे काम हे पक्ष करत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शहरातील मोंढा मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मोठ्या प्रमाणावर प्रकाश आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांची आणि महिलांची संख्या लक्षणीय होती.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी