अखेर दिड वर्षापासुन धुळखात पडुन असलेली २०० खाटांची माता व बालसंगोपन ईमारत कार्यान्वित होणार ; जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सुचना

अखेर दिड वर्षापासुन धुळखात पडुन असलेली २०० खाटांची माता व बालसंगोपन ईमारत कार्यान्वित होणार ; जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सुचना ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश:- डॉ.गणेश ढवळे 
बीड:- ( दि.०७ ) सन २०१६-१७ साली जिल्हा रुग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत माता व बाल रुग्णालय उभारण्यासाठी २१ कोटी रुपये निधीची मंजुरी मिळुन तरतूद करण्यात आली होती.मात्र कंत्राटदारांच्या ढिसाळ कारभारामुळे काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यानंतर गेल्या दिड वर्षापासुन इमारतीचे काम पूर्ण होऊनही आक्सिजन पाइपलाइन लिफ्ट, विद्युतीकरण, अग्निरोधक यंत्रणा आदी काम अपूर्ण राहिल्याने ईमारत २०० खाटांची ईमारत धुळ्यात पडुन होती. याचवेळी जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या अपु-या कोंदट व ईमारतीत उपचारांमुळे महिलांची हेळसांड होत होती. त्यामुळे तातडीने काम पूर्ण करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली सहका-यांनी वर्षभरापासून निवेदन तसेच आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला.तत्कालिन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ -मुंडे यांनी आंदोलनाची दखल घेत जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष ईमारतीची पाहणी करत जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून ३ कोटी रूपयांची तरतूद केली होती. वर्षभरापासून तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ.अशोक बडे आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर दि.०६ बुधवार रोजी डॉ.अशोक थोरात यांनी पाहणी करून रुग्णालय सुरू करण्याबाबतच्या तांत्रिक बाबींच्या सुचना आधिका-यांना दिल्या असुन दहा दिवसांत कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगितले. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन महिलांची हेळसांड थांबणार आहे.



 १५ आगस्ट पासुन महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवा मोफत करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून बीड जिल्हा रुग्णालयातील आंतररूग्ण आणि बाह्यरुग्ण संख्येत कमालीची वाढ झाली असुन 
बीड जिल्हा रुग्णालयाची आंतररुग्ण क्षमता ३२० आहे तर दररोज ४०० -५००च्या आसपास रूग्ण उपचारासाठी येतात.वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्हा रुग्णालयाच्या अपु-या , कोंदट वातावरण असलेल्या जुन्या ईमारतीत गर्दी होत असुन जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात खाटा अपु-या पडत असुन यामुळे नवजात बालके व नवमातांची तारांबळ उडत असल्याचे शेजारील २०० खाटांची सोय असलेल्या दिड वर्षापासुन धुळखात पडुन असलेल्या माता व बाल रुग्णालयाची ईमारत कार्यान्वित केल्यास रूग्णांची अडचण दुर होऊ शकते यासाठी डॉ.गणेश ढवळे व सहका-यांनी पाठपुरावा वर्षभरापासून केला होता.अखेर लवकरच ईमारत कार्यान्वित होणार आहे.आणि महिलांची हेळसांड थांबणार आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ -मुंडे यांनी आंदोलनाची दखल घेत ३ कोटी रुपये निधी मंजूर केला होता 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालयात महिला व बालरुग्णांसाठी २१ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली २०० खाटांची ईमारत निधी अभावी धुळखात पडुन असुन जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून तातडीने निधी देण्यात यावा यासाठी दि.५ फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्यानंतर त्याच दिवशी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देत ईमारतीची पाहणी करून आक्सिजन पाइपलाइन, विद्युतीकरण,अग्निरोधक यंत्रणा यासाठी ३ कोटी रूपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजना निधीतून मंजूर केला होता.ईमारतीची पाहणी करताना तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, डॉ.हनुमंत पारखे उपस्थित होते.

 डॉ.अशोक थोरात यांनी ईमारत कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक बाबींच्या सुचना दिल्या 

माता व बाल रूग्णालयाची ईमारत कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्यानंतर काल दि.६ बुधवार रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी नव्या ईमारतीची पाहणी करून रूग्णालय सुरू करण्याबाबतच्या तांत्रिक सुचना आधिका-यांना दिल्या असुन यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संतोष शहाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.आर तांदळे,नोडल अधिकारी डॉ.हनुमंत पारखे उपस्थित होते.सध्या प्रसुती,सिझेरीयनमध्ये जिल्हा रुग्णालय अव्वल नंबर असुन नव्या इमारतीमध्ये महिला व बालकांसाठी स्वतंत्र रूग्णालय सुरू झाल्यानंतर आणखी रूग्ण सेवा आधिक प्रभावी होणार असुन सर्व तयारी अंतिम टप्प्यात असुन साधारणतः १० दिवसात ईमारत कार्यान्वित होणार असल्याचे डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी