ईगतपुरी विधानसभा मतदारसंघात कशी असेल लढत ? माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट ?
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
दिवाळी संपताच माघारीची अंतिम तारीख असुन माघारीनंतरच ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन विदयमान आमदार हिरामन खोसकर, महाविकास आघाडी कडुन कॉग्रेस पक्षाकडुन लकी जाधव तर मनसे कडुन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे प्रमुख उम्मीदवार रिंगणात उतरले आहेत. या तीनही उमेदवाराच्यां उमेदवार्या हया निश्चित झालेल्या आहेत.
यात माजी आमदार सौ. निर्मला गावित यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी केली आहे.त्या प्रबळ उमेदवार आहेत.त्यामुळे या लढतीमध्ये रंगतदार वळण आले आहे.
सौ.निर्मला गावित यांचे सोबत कॉग्रेस व उबाठा शिवसेनेची मोठी ताकद उभी राहिली आहे. सलग दहा वर्ष त्या या मतदारसंघात आमदार म्हणुन कार्यरत असल्याने त्यांचा मोठा दबदबा व वर्चस्व या मतदारसंघात आहे.सौ.गावित या रिंगणात राहिल्या तर महाविकास आघाडी चा प्रमुख उमेदवार बाजुला सारला जाईल अशी भिती व्यक्त होत आहे.त्यामुळे लकी जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवाराची डोकेदुखीही वाढली आहे तर विदयमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार हिरामन खोसकर यांचे समोर ही सौ.गाविताचें कडवे आव्हान उभे राहणार आहे.
सौ.गावित यांचेसह माजी पंचायत समिती सभापती गोपाळा लहांगे यांनी परके विरुद्ध स्थानिक हा वाद चव्हाटयावर आणत मोठी आघाडी उघडली आहे.लहांगे यांची उमेदवारी महाविकास आघाडी ला भोवणार आहे.
महायुतीतही शिवसेनेत बंडाची लागण झाली आहे. शिवसेनेचे बरेचसे पदाधिकारी हे मनसेच्या मेंगाळ यांचे सोबत गेल्याचे दिसत आहे.
एकुणच येथे महायुतीला राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप ची साथ असली तरी शिवसेनेची डोकेदुखी हिरामन खोसकर यांचे समोर ठाकली आहे.
यासह माजी आमदार पांडुरंग गांगड, डॉ. शरद तळपडे, एल्गार चे भगवान मधे, माजी आमदार शिवराम झोले यांचे चिरंजीव बाळासाहेब झोले असे अनेक उमेदवार रिंगणात आहेत.
त्यातले काही महायुतीचे तर काहि महाविकास आघाडी चे आहेत.
एकुणच दोन्ही आघाडीतील उमेदवारांसमोर बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे.
त्यात दि.४ नोव्हेंबर रोजी माघारीची अंतिम तारीख असुन याच दिवशी माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
Comments
Post a Comment