शेवगांव मध्ये उद्या विधवा महिला सन्मान व संरक्षण सोहळ्याचे आयोजन स्त्री शक्ती फाउंडेशन शेवगांव व माजी जि.प.अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन



{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

या बाबत सविस्तर वृत्त असे की उद्या शुक्रवार दि ११ रोजी सकाळी ११ वाजता स्व. लोकनेते मारुतरावजी घुले पाटील जिनिंग नेवासा रोड, शेवगांव येथे विधवा महिला सन्मान व सौरक्षण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याबाबतची स्त्री शक्ती फाउंडेशचे शेवगांव येथील संस्थापक प्रथमेश सोनवणे, उपाध्यक्ष फरजाना बाबामिया सय्यद व सचिव रंजना प्रथमेश सोनवणे यांनी दिली आहे. या बाबत माहिती देताना ते म्हणाले की, सोलापूर येथील विधवा सन्मान
त्याचा कायद्याचे जनक प्रमोद झिंजाडे यांच्या पुढाकारातून राज्यात गेली अनेक महिन्या पासून विधवा महिलाना त्यांचे न्याय व हक्क मिळावेत म्हणून लढा देत असून त्यांच्या या लढ्यामुळे राज्यातील हजारो महिलांना मोठा आधार मिळाला असल्याने त्याच धर्तीवर उद्या शेवगावात विधवा महिला सन्मान व सौरक्षण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. राजश्रीताई घुले उपस्थित राहणार असून महिला बालविकास अधिकारी नारायण कराळे यांचे हस्ते उदघाट्न होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून विधवा महिला कायद्याचे जनक प्रमोद झिंजाडे व राज्य समन्वयक राजूभाऊ शिरसाठ यांचेसह डॉ. क्षितिज घुले, तहसीलदार प्रशांत सांगडे, पो. नि. समाधान नांगरे, गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, एकल महिला पुनर्वसन समितीचे प्रदेश निमंत्रक हेरंब कुलकर्णी,काकासाहेब नरवडे,अरुण लांडे, संजय कोळगे, ताहेर पटेल, शरद अरगडे व प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती रहाणार असून तालुक्यातील विधवा महिलासह इतरही महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असेही आवाहन सोनवणे व सय्यद यांनी केले आहे.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी