आ. क्षीरसागर शंभर टक्क्यांनी नापास - एस.एम.युसूफ़


बिंदुसरा नदीवरील पुलाचा आणि महेदवीया दायरा कब्रस्तान च्या संरक्षक भिंतीचा प्रश्न सोडवलाच नाही

बीड (प्रतिनिधी) - बीड शहरातील मोमीनपुरा-खासबाग जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाचा प्रश्न तसेच मोमीनपुरा भागातील महेदवीया दायरा कब्रस्तान च्या दोन भिंती बांधून देण्याचा प्रश्न आमदार म्हणून संदीप क्षीरसागर यांना सोडवायला दिले होते पण हे दोन्ही प्रश्न ते त्यांच्या कार्यकाळात सोडवू शकले नाहीत. यामुळे आ. क्षीरसागर हे शंभर टक्क्यांनी नापास झाल्याचे हे दोन्ही प्रश्न मांडणारे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, कुरेशी मुहल्ला, मोमीनपुरा, मुहम्मदिया कॉलनी, बीड मामला या भागातील बहुसंख्य नागरिकांना विविध कामांसाठी शहरात येण्याकरिता जवळचा असलेला मार्ग हा बिंदुसरा नदी मधूनच येतो. जिल्हा रुग्णालयासह अनेक खाजगी दवाखान्यात जाणारे रुग्ण, विविध शैक्षणिक संस्था म्हणजेच शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी व शिक्षक, फ्रुट आडत मार्केट-भाजी मंडईत जाणारे विक्रेते आणि ग्राहक, बस स्टॅन्ड ला जाणारे-येणारे प्रवासी तसेच मोमीनपुरा भागातील मोठ्या कापड मार्केटमध्ये खरेदीसाठी जाणारे-येणारे ग्राहक बिंदूसरा नदीमधील याच मार्गाचा उपयोग करतात. हा मार्ग कच्चा असला तरी वर्षातील सात-आठ महिने येथून नागरिक पायी, सायकल, मोटरसायकल, ऑटो रिक्षा, चार चाकी वाहने आदींमधून ये-जा करतात. पावसाळ्यात जेव्हा नदीला पाणी येते तेव्हा मात्र हा जवळचा मार्ग बंद होऊन जातो. म्हणून नागरिकांना मोठा वळसा घेऊन बार्शी रोड मार्गे किंवा जुना बाजार मार्गे आणि दगडी पुलावरून जर पाणी वाहत असेल तर मग आंबेडकर पुतळा मार्गे मोठा वळसा घेऊन ये-जा करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन खासबाग-मोमीनपुरा जोडण्यासाठी पुलाचे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आलेला आहे. त्यावर कार्य व्हावे आणि हा नियोजित पूल तयार व्हावा, याकरिता आतापर्यंत दोन वेळा बिंदुसरा नदीमध्ये डुबकी लगाव आंदोलन केलेले आहे. यामुळे आमदारांना खळबळून जाग आली आणि त्यांनी फक्त कागदपत्रे घेऊन कधी अजित पवार तर कधी जयंत पाटलांना या प्रश्नी भेट घेतल्याचे तसेच पूल कम बंधारा बांधण्याची मोठ्या प्रमाणात हवा निर्माण केली परंतु त्यांचा कार्यकाळ संपला तरी त्यांना हा पूल बांधून घेता आला नाही. हा प्रश्न नव्वद गुणांचा होता परंतु तो त्यांना सोडवता आला नाही. दुसरा प्रश्न होता मोमीनपुरा भागात असलेल्या साडेचारशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या ऐतिहासिक महेदवीया दायरा कब्रस्तान च्या दोन भिंती जीर्ण होऊन जमीन दोस्त झाल्याचा. त्या आमदार फंडातून बांधून द्याव्या याकरिता सुद्धा आमदार क्षीरसागर यांच्याकडे प्रश्न मांडला होता. यामुळे त्यांनी 23 जानेवारी 2023 रोजी आपल्या लवाजम्यासह कब्रस्तानात येऊन पाहणी केली. संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन दिले. त्याला आता पावणेदोन वर्षे झाली तरीही कब्रस्तानची संरक्षक भिंत त्यांना काही बांधून देता आली नाही. हा प्रश्न फक्त दहा गुणांचा होता, तरीही तो त्यांना सोडवता आला नाही. अशाप्रकारे हे दोन्ही प्रश्न त्यांच्या जवळपास संपलेल्या कार्यकाळात त्यांना सोडविता न आल्याने ते शंभर टक्क्यांनी नापास झाल्याचे हे दोन्ही प्रश्न मांडणारे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी