माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांना डी.वाय.एस.पी.विश्वंभर गोल्डे यांचे गैरवर्तन



बीड चे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली या गैरवर्तन प्रकाराची तक्रार 

 बीड प्रतिनिधी -उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोल्डे व त्यांचे कार्यालयातील कर्मचारी यांनी दिनांक 16/10/2024 रोजी विनाकारण त्रास दिला आहे.पोलीस मुख्यालय येथे 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान दिनांक 09/04/2024 माहिती अधिकार अर्जावर काय कारवाई झाली का?विचारणा करिता गेलो होतो.
पूर्व वैमन्यस माझ्या बद्दल सदरील कार्यालयाचे कर्मचारी, अधिकारी यांच्यात दिसून आले, या कार्यालयात बॅन करण्याचा प्रकार दिसून आला.उल्लेखित तारखेला जेव्हा माजी सैनिक प्रकाश वाघमारे तेथे पोहोचलो व विचारपूस करू लागलो, चुकीची माहिती देवून पडताळीत करता हे योग्य नाही असे म्हणालो,माहित न होता निर्णय घेता हजर असल्यास सुनावणी पुढे ढकलतो माहिती आपल्या संबंधीत असतानी राज्य आयोगाकडे वर्ग करता हा कर्तव्य कसूर अधिकारांचा गैरवापर आहे. तेथील कर्मचाऱ्यांना म्हणालो त्याच क्षणी या कार्यालयाची माहिला कर्मचारी शिंदे व इतर तीन कर्मचारी उपविभागीय अधिकारांना विचारतो म्हणून उपविभागीय अधिकारी विश्वंबर गोल्डे यांच्या कॅबीन मध्ये गेले व बंद दरवाजात चर्चा करून वाद घालण्याचा प्लॅन केला, वाईट शब्द प्रयोग करा म्हणजे संबंधित व्यक्ती मोठ्याने बोलल्या मुळे त्याच्यावर कलम 353 गुन्हा दाखल करू आणि कॅबीन मधून बाहेर आल्यावर तसा प्रकार ही झाला, माझ्याशी हुज्जत घातली, वाद विवाद केला.उपविभागीय अधिकारी यांनी पोलीस गाडी मागवून तेथील कर्मचाऱ्यांना आदेश दिले धक्के मारून याला गाडीत नेवून बसवा पोलीस मुख्यालय गेट पासून शहर पोलीस स्टेशन बीडला घेवून गेले व सकाळी 11 ते रात्री 10 वा. पर्यंत बसवून ठेवले. तेथील कर्मचारी ही आरोपी प्रमाणे माझी हजेरी घेत होते. हा विनाकारण त्रास देण्यात आला, असैवंधानिक भाषेचा वापर केला. अपमानीत केले, आपण या विभागाचे प्रमुख असल्याचने यांच्या गैरवर्तनावर कारवाई करण्याचे आपले कर्तव्य आहे, आपणास विनंती उचीत कारवाई करावी,अशी माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी निवेदनाद्वारे एस.पी.कडे मागणी केली आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी