छत्रपती संभाजी राजेंचा दौरा प्रसितापीतांना धक्का देणार



नाशीक मघील आमदाराचा मेळाव्याला विरोध करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा.

छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत " स्वराज्य संकल्प" मेळावा मंगळवार दि.१५/१०/२०२४ रोजी सायंकाळी ,ठीक ०६ वाजता ,ठिकाण :- रावसाहेब थोरात सभागृह,गंगापूर रोड के.टी.एच.एम.कॉलेज शेजारी संपन्न होणार आहे.तत्पूर्वी सायं ०५ वाजता पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन संकल्प मेळाव्याला प्रारंभ होणार असून ढोल ताशांच्या गजरामध्ये अभिवादन केल्यानंतर छत्रपती संभाजी राजे हे कार्यक्रम स्थळाकडे आगमन करणार आहेत.नाशिक जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
प्रमुख मार्गदर्शक :- 
स्वराज्य प्रमुख - छत्रपती संभाजी राजे 
 नाशीक मधील जनतेला काय आव्हान करता या कडे सर्वांचे लक्ष आहे त्याच पिरमाने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव व राज्य कार्यकारणी उपाध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहे.
           महाराष्ट्र स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजी राजे यांचे नाशिक वर असलेले विशेष प्रेम व महाराष्ट्र सह नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आढावा व पूर्वनियोजनाबाबत स्वराज्य संकल्प मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून स्वराज्याची स्थापना केल्यापासून विधानसभा सह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केलेले असून त्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हे जोमाने कामाला लागले असून संभाव्य उमेदवार व इच्छुक उमेदवार आदींचा ताळमेळ बसून महायुती व महाविकास आघाडी यांना रोखण्यासाठी महापरिवर्तन शक्तीच्या रूपाने महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील अनेक सामाजिक,राजकीय,कृषी,शैक्षणिक,कामगार, सहकार,महिला सक्षमीकरण आदी सर्वच क्षेत्रातील आघाडीवर शासनकर्ते मग महाविकास आघाडीचे मागील १५ वर्ष असेल किंवा महायुतीचे सरकार असेल हे सपशेल अपयशी ठरलेले असून देशात महाराष्ट्राचा असलेला अग्रक्रम हा दिवसेंदिवस खालावत चाललेला असून महाराष्ट्राची ही पिछाडी जर थांबवायची असेल आणि महाराष्ट्राचा विकास सर्वगुणसंपन्न करायचा असेल तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या समर्थ नेतृत्वात छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाने पुढे नेण्याच्या दृष्टीने राजकारणाच्या आखाड्यामध्ये पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे. तशी तयारी देखील पूर्णत्वाकडे आहे.

या पत्रकार परिषदेसाठी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी , जिल्हा संपर्कप्रमुख उमेश शिंदे, जिल्हाप्रमुख डॉ रुपेश नाठे ,विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख सागर पवार, महानगर प्रमुख रोशन खैरे ,नितीन पाटील, योगेश शेजवळ समाधान जाधव , विजय चुंभळे , नारायन बोराडे , बाळासाहेब , रेखा जाधव ,कुनाल देसले , बाळा जाधव, धीरज चौधरी आदी उपस्थित होते.



विधानसभेचा धसका घेऊन प्रस्तापीत नेते जर स्वराज्य पक्षाचा मावळ्यांवर दबाव टाकत असतील तर छत्रपती संभाजीराजे आज स्वराज्य संक्लप मेळाव्यातुन जशास तस उत्तर देनार असा आम्हाला पुर्ण विश्वास आहे.
जिल्हाप्रमुख रुपेश नाठे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी