श्री कालंदेश्वर महादेव मंदिर भू माफीयांच्या तावडीतून मुक्त!

श्री कालंदेश्वर महादेव मंदिर भू माफीयांच्या तावडीतून मुक्त!
मनसेच्या लढ्याला यश; महसूल जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ग 2 ची जागा 1 करण्याचे आदेश केले रद्द-वर्षा जगदाळे 


 बीड प्रतिनिधी - शहरातील फुलाई नगर भागात सुमारे पाचशे वर्षापूर्वीचे काळा पाषाण मधील श्री कालदेश्वर महादेव मंदिर परिसरातील जागा हडपण्याचा डाव काही भूमाफीयांनी रचला होता. मंदिराला ठराविक जागेत बंदिस्त करत राहिलेल्या जागेवर व्यावसायिक इमारत बांधकाम करण्याचा डाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्यामुळे अखेर संपुष्टात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी महसूल यांनी वर्ग दोन ची जागा एक मध्ये वर्गीकरण करण्याच्या आदेशाला जिल्हाधिकारी यांनी रद्दबदल ठरवलं आहे. मागील वर्षापासून बीड जिल्हाधिकारी ,मुख्याधिकारी नगरपरिषद, छत्रपती संभाजी नगर येथील पुरातन विभागाला कालिंदेश्वर मंदिराबाबत निवेदने व आंदोलन करण्याची इशारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षा जगदाळे यांनी दिले होते. छत्रपती संभाजी नगर येथील पुरातन विभागाची एक टीम या मंदिराचे सर्वे करून गेली होती. जिल्हाधिकाऱ्यांना येथील अवैध बांधकाम थांबवण्याबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली होती याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेत भुमाफियांच्या तावडीतून श्री कालिंदेश्वर महादेव मंदिर मुक्त केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला अखेर यश मिळाले असल्याचे मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षा जगदाळे यांनी म्हटले आहे. 
फुलेनगर भागातील नदीपात्रात सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे श्री कालंदेश्वर महादेव मंदिर सापडले होते. येथील जमीन सपाट करत येथे व्यवसायिक बांधकाम करण्याचा विडा शहरातील काही प्रतिष्ठित भुमाफियांनी उचलला होता. मंदिर परिसरातील जमिनीवर आपला हक्क सांगत येथे बांधकाम करण्यास सुरुवातही झाली होती .याची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली. मंदिर परिसराची पाहणी केली असता येथे अवैद्यपणे मंदिर परिसरात संरक्षण भिंत व शिखराचे बांधकाम कोणाचेही परवानगी न घेता करण्यात येत होते सदरील बांधकाम महाराष्ट्र निर्माण सेनेने आंदोलन करून बंद पाडले होते .तसेच नगरपालिका मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात तक्रार अर्ज करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर येथे पुरातन विभागाला याची माहिती देऊन मंदिराचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांनी या सर्व प्रकरणाची तपासणी करत तत्कालीन जिल्हाधिकारी महसूल यांनी वर्ग दोन मधून एक मध्ये वर्गीकृत केलेली जमीन रद्द करत भूमाफियांना दणका दिला आहे. मंदिर बचाव आंदोलना मुळे या भूमाफियांना दणका बसला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखंडपणे चालवलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असल्याचे वर्षाताई जगदाळे यांनी म्हटले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी