ध्येय निश्चिती, जिद्द, अभ्यासातील सातत्य व पालकांच्या कष्टाची जाण ठेवून यश मिळवता येते-प्रा. डॉ. शिवाजीराव दिवाण



 बीड (प्रतिनिधी) उच्च शिक्षण मिळवण्याकरता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले तरी आपले ध्येय गाठण्याकरता त्यांनी 18 - 18 तास अभ्यास करून आपली ध्येय गाठले. डॉ. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना ध्येयनिश्चिती, जिद्द व अभ्यासातील सातत्य व पालकांच्या कष्टाची जाण ठेवून यश नक्की मिळेल असे प्रतिपादन प्रा. डॉ. शिवाजीराव दिवान यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना केले.
       दिनांक : 6 - 12 - 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करून मिळालेल्या दानातील शालेय साहित्य गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना महामानव अभिवादन ग्रुप तर्फे आम्रपाली बुद्ध विहार व जय भीम नगर बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (पूरग्रस्त कॉलनी) येथे 68 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त सीईओ बनसोडे साहेब व प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. दिवाण यांच्या हस्ते 131 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले तर प्रास्ताविक डी.जी. वानखेडे यांनी करून महामानव अभिवादन ग्रुप समाज उपयोगी राबवीत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. आतापर्यंत शालेय साहित्य वाटपाच्या दहा फे-या पूर्ण करून 501 विद्यार्थ्यांना वाटप केले आहे. संविधान दिन 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत 300 विद्यार्थ्यांना प्राप्त केलेले शालेय साहित्य वाटप करण्याचे नियोजन केलेले आहे. प्रा. डॉ. दिवाण पुढे म्हणाले की, सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकावयाचे असेल तर उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही. वाटेल ते कष्ट करावयास लागले तरी आपली गरिबी शिक्षणाच्या आड येऊ देऊ नका असा बहुमोल उपदेश केला. कार्यक्रमास सेवा निवृत्त प्रबंधक एलआयसी यू.एस. वाघमारे, महामानव ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, सेनि. शिक्षक आर. डी. चक्रे, दादाहरी गायकवाड, वडमारे इंदुबाई, भानुदास कांडेकर, मालन कोरडे, बबीता कोरडे, सोनाली कोरडे, रेखा वीर, रमा जोगदंड, सीमा चांदणे, डॉ. समृद्धी दिवाण, अमोल हिरवे व परिसरातील बहुसंख्य पालकांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बप्पा जावळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करिता योगेश शिंदे, प्रेरणा गायकवाड, अतुल कोरडे, आयुष जाधव यांनी बहुमोल परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात येऊन सरणयतयाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी