शेवगांव बस स्थानकाचा भोंगळ कारभार नावाच्या फलकाताच शहराचे नाव चुकले "टिम्ब" खाऊन टाकला "शेवगांव" चा "शेवगाव" कोणीतरी शुद्ध मराठी शिकवा रे यांना



{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

या बाबत सविस्तर वृत्त असे की निर्माणाधीन असलेल्या नूतन बस स्थानकाचे काम गोगल गायीच्या गतीने सुरु असुन त्यात असंख्य अक्षम्य चुका होताना दिसत आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही पुरेश्या बस नाहीत स्टाफ आहे पन अनेक चालक वाहक दिवस दिवस गाड्यांची वाट पाहून कंटाळून घरी निघुन जातात MIDC नावाच्या कंपनीने रॅम्प बनवण्याचे काम घेतले आहे आठ दिवसांच्या कामाला तीन महिने लावले आहेत अजुन एसटी ची हद्दच ठरली नाही त्यामुळे काँकरीट किती जागेवर करायचे याचाच मेळ लागेना 



गेल्या चारपाच वर्षांपासून एसटी बसेस कमी असल्याने लांब पल्ल्याच्या अनेक बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत पुणे नाशिक कोल्हापूर संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड अहिल्यानगर बारामती खान्देश जळगांव बस बंद करण्यात आल्या आहेत या कडे कोण लक्ष देणार शेवगांवला प्रवासी संघटना सापडून दाखवा एक हजार रुपये बक्षीस मिळवा अशी स्पर्धा ठेवायला काही हरकत नाही


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी