प्रबोधिनी मार्मिक साप्ताहिक कथा स्पर्धेत नवनाथ गायकर यांच्या कथेस उत्तेजनार्थ पारितोषिक जाहिर



ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर याजकडुन

    साहित्यसेवक वसंत तावडे स्मृतीप्रित्यर्थ प्रबोधन - मार्मिक साप्ताहिक गोरेगाव, मुंबई यांचे वतीने आयोजीत महाकथा स्पर्धेचा निकाल प्रबोधन- मार्मिक चे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे यांनी जाहिर केला आहे.
  या स्पर्धेत आहुर्ली ता.ईगतपुरी, जि. नाशिक येथील लेखक नवनाथ अर्जुन पा गायकर यांच्या "नावात काय आहे ?" या विनोदी कथेस उत्तेजनार्थ पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे.
  या स्पर्धेचे परिक्षण नामवंत विनोदी लेखक सँबी परेरा, पत्रकार तथा लेखक विनोद पितळे व साप्ताहिक मार्मिक चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी केले आहे.
  लेखक नवनाथ गायकर यांच्या शेतकरी जीवनावरील आधारित जिमिन या कथेस विदर्भातील अकोट,जि. अकोला येथील प्रतिभा साहित्य संघाचा प्रथम पुरस्कार नुकताच प्रदान करणेत आलेला आहे.
  त्या पाठोपाठ मराठी साप्ताहिकामधील स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या पहिल्या लोकप्रिय व्यंगचित्र साप्ताहिकाचे वतीने आयोजीत या स्पर्धेत नवनाथ गायकर यांची लेखणी पुन्हा एकदा चमकली आहे.
  गायकर यांचे या यशाबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी, सदस्य, जिल्हाध्यक्ष आदीसह अनेक साहित्यीक, पत्रकार यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरानीं अभिनंदन केले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी