पाटोदा व नेकनुर ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर युनिट सुरू करा ; डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांना निवेदन

पाटोदा व नेकनुर ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर युनिट सुरू करा ; डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांना निवेदन:- डॉ.गणेश ढवळे 
बीड:- ( दि.१८ ) पाटोदा तालुक्यातील पाटोदा ग्रामीण रुग्णालय आणि बीड तालुक्यातील नेकनुर स्त्री व कुटीर रूग्णालय येथे ट्रॉमा केअर सेंटरची अत्यावश्यकता असुन तातडीने सुरू करण्यात यावे. अहमदपूर ते अहमदनगर आणि पैठण ते पंढरपूर दोन राष्ट्रीय महामार्गावरील अतिवेगाने वाहन चालवणे त्याच बरोबर उखडलेले रस्ते आणि रखडलेल्या कामांमुळे वाढत्या अपघातांची संख्या पाहता तातडीने उपचार न मिळाल्याने अपघातग्रस्तांना जीव गमवावे लागत असुन तातडीने पाटोदा आणि नेकनुर याठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे , शेख युनुस,स्वप्निल गलधर, निळकंठ वडमारे, विजय लव्हाळे, शेख मुबीन यांनी डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी डॉ.अशोक थोरात यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले.

पाटोदा ग्रामीण रुग्णालय येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात यावे 

पाटोदा तालुका हा दुष्काळी आणि ऊसतोड मजुरांचा तालुका असुन तीन तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. अहमदपूर ते अहमदनगर आणि पैठण ते पंढरपूर असे दोन राष्ट्रीय महामार्ग तालुक्यातुन जातात.वेगाने वाहने चालविणे तसेच जागोजागी उखडलेले आणि रखडलेले रस्त्यांचे काम यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असुन तातडीने उपचार न मिळाल्याने अपघातग्रस्तांना आपले जीव गमवावे लागत आहेत.पाटोदा ग्रामीण रुग्णालयात दररोज ३०० रुग्ण उपचारासाठी दाखल होतात.याठीकाणी सुसज्ज इमारत असुन शस्त्रक्रियेसह इतर सुविधा उपलब्ध आहेत.मात्र ट्रॉमा केअर युनिटची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.आष्टी व शिरूर या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी ट्रॉमा केअर युनिटची सुविधा उपलब्ध असून केवळ पाटोदा तालुक्यातील ग्रामस्थ यापासून वंचित आहेत.हा पाटोदा तालुक्यातील ग्रामस्थांवर अन्याय आहे.त्यामुळे पाटोदा ग्रामीण रुग्णालय येथे ट्रॉमा केअर निर्मिती करून सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.अशी मागणी करण्यात आली आहे.

ट्रॉमा केअर सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा; दर्जेदार उपचार होण्यास मदत 

 ट्रॉमा केअर सेंटर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर त्याठिकाणी सिटीस्कॅन मशीन,एसीजी हाडाचे ऑपरेशन, २ आर्थिफिजिशियन, भुलतज्ञ,२ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती झाल्याने तातडीने आणि दर्जेदार उपचार होण्यास मदत होणार आहे.

गेल्यावर्षी पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. :- डॉ.गणेश ढवळे 

पाटोदा ग्रामीण रुग्णालय येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे आणि त्यांचे सहकारी तथा पत्रकार शेख जावेद, हमीद खान पठाण, महादेव नागरगोजे,पवन अडागळे, भगवान जावळे, राहुल जाधव, रामदास भाकरे,गौतम जावळे, रमेश दळगडे, गणेश रणदिवे यांनी दि.०५ ऑक्टोबर रोजी पाटोदा ग्रामीण रुग्णालय येथे धरणे आंदोलन केले होते.तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदाशिव राऊत यांनी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांना धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने लेखी पत्र दिले होते.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी