आष्टी तहसील कार्यालया मध्ये नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने १४ ऑक्टोबर रोजी आंदोलन - समाजसेवक परमेश्वर घोडके


आष्टी( प्रतिनिधी --गोरख मोरे ) : 
          आष्टी तहसील कार्यालया मध्ये कामाच्या निमित्ताने येणारे नागरिक / माता/ भगिनी यांना तहसील कार्यालया मध्ये हक्का च्या सुविधा मिळत नसल्याने १४ ऑक्टोबर रोजी गांधीगिरी आंदोलन करण्याचा ईशारा समाजसेवक परमेश्वर घोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे . पुढे पत्रकात सांगितले की , 
आष्टी तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिका /माता भगिनींना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळत नाहीत . या मध्ये तहसीदार कार्यालय परिसरात पिण्याचे स्वच्छ पाणी नाही ?माता भगिनी /पुरुष यांना स्वतंत्र मुतारी नाही? 
 संडासची सोय नाही ? म्हणून कार्यालयाच्या कंपाउंड भोवती महिला /पुरुषांना नैसर्गिक विधी करावा लागतो . .कार्यालयात / परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून , गवत झाडे मोठमोठे झाले आहेत . विशेष म्हणजे कार्यालयातीलच कर्मचाऱ्यांच्या मावा ,गोवा ,खाऊन थुकीनें कित्येक परिसरात ,भिंतीवरती  
,सडांपडला असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे . 
  कार्यालयातून देण्यात येणारे कागदपत्र, खसरा पत्रक, कुपन, शपथपत्र, संजय संजय गांधी, श्रावणबाळ योजना,फेरफिर व अन्य कागदपत्रं साठी मोठ्या प्रमाणात लुट केली जात असून , याठिकाणी 
कुठेही नियमावलीचा बोर्ड नाही ? किंवा वसूल केलेल्या रक्कमाची पावती भेटत सुध्दा नाही . आष्टी तहसील कार्यालया मध्ये नागरीकांच्या हक्काच्या सुविधाची कोणतीही माहिती कोणताच कर्मचारी स्वतःहून जाहीर प्रकटन करीत नाही .   
   विशेषतः तहसील कार्यालया मध्ये राजकीय पक्ष/ पार्ट्यांच्या लोकांचा जास्त हस्तक्षेप दिसून येतो . व कर्मचारी ही त्यांनाच प्राधान्य देतात . सर्वसामान्यांना मात्र ते कर्मचारी उद्धटपणाची वागणूक देतात . हे सर्व १४ ऑक्टोबरच्या आतं थांबले नाही तर , गांधीगिरी पद्धतीने आष्टी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात- निवेदनात समाजसेवक श्री. परमेश्वर रामचंद्र घोडके , स्वप्निल शिवाजी पोटे , युवा नेते शौकत पठाण , धुळाजी लकडे , अशोक माने , कैलास दरेकर , प्रा. राम बोडखे , शेख अजमुद्दिन यासह आष्टी तालुक्यातील संविधान प्रेमी , ग्रुपमेंबर यांनी गांधीगिरी आंदोलनाचा इशारा दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे .

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी