पाटोदा तालुक्यातील मुगगांव येथील मग्रारोहयोच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करा नसता विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर संजय खोटे करणार आत्मदहन .


पाटोदा (गणेश शेवाळे)पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथिल सरपंच, रोजगार सेवक व पंचायत समितीचे नरेगा विभागातील कर्मचारी यांनी मग्रारोहयोच्या कामात लाखोंचा अपहार केला असुन.याची कसल्याही प्रकारची चौकशी करून कारवाई न झाल्याने मुगगाव येथिल माजी सरपंच संजय खोटे यांनी आज दि १७रोजी विभागिय आयुक्त कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.
     श्री. संजय गोरक्ष खोटे, ग्रामपंचायत सदस्य, मुगगांव यांनी निवेदन दिं. ०३.१०.२०२४ दिले होते.मुगगाव येथिल अर्जदार श्री. संजय गोरक्ष खोटे, ग्रामपंचायत सदस्य, मुगगांव, ता. पाटोदा जि.बीड यांचे संर्भिय निवेदन या कार्यालयास दिले आहे.संजय खोटे यांनी मौजे मुगगांव ता. पाटोदा जि.बीड येथील ९०/१० चे सार्वजनिक कामे, सिमेंट रस्ते, सार्वजनिक ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकणे, तसेच खडीकरण मजबुती करणाची कामे तसेच मजूर कामावर नसतांना दाखवून तसेच ही सर्व कामे मशिनव्दारे काम करुन लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याबाबत तसेच कुशल कामाचे बीले कामाची तक्रार असतांना चौकशी न करताचअंदाजपत्रकानुसार कामे नसतांना कुशल बीले ऑनलाईन झाल्याबाबत दि. ०३.०६.२०२४ रोजी संजय खोटे यांनी दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे चौकशी न झाल्यास व ८ दिवसांत चौकशी समितीचा अहवाल घेऊन सरपंच / ग्रामरोजगार सेवक यांच्यावर कारवाई न झाल्यास दिं. १७.१०.२०२४ रोजी मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे
कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याबाबत निवेदनाव्दारे कळविले आहे. संजय खोटे यांनी दिलेल्या निवेदनावर चौकशी समिती स्थापन केली मात्र या समितीने कसलीही चौकशी केलेली नाही असा आरोप संजय खोटे यांनी केला आहे.
 या प्रकरणी कार्यवाही न झाल्यास निवेदनकर्ता यांनी दि. १७.१०.२०२४ रोजी मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याबाबत इशारा दिलेला असल्याने, सदरील प्रकरणाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन संर्भिय निवेदनात नमुद मुद्यांच्या अनुषंगाने प्रचलित शासन निर्णय व नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करुन शासन नियमानुसार सविस्तर चौकशी करण्यात यावी. निवेदनकर्ता यांना आत्मदहन करण्याच्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत निवेदनकर्ता यांना जिल्हा स्तरावरुन काहीही कळविण्यात आले नसल्याने तक्रार दार संजय खोटे हे आज विभागिय आयुक्त कार्यालया समोर आत्मदहन करणार आहेत.असे संजय खोटे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.



   पाटोदा तालुक्यातील प्रत्येक गावात मग्रारोहयोच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार होतोय.अनेक ठिकाणी मस्टर काढली जातात मात्र कामाचा पत्ताच लागत नाही.पाटोदा पंचायत समितीचे कर्मचारी व रोजगार सेवक हे संगणमताने भ्रष्टाचार करत आहेत.असे स्पष्ट दिसत आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी