ईगतपुरी विधानसभा मतदारसंघात भावी आमदाराचीं वाढली गर्दी


ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन

   विधानसभा निवडणुक जाहिर होऊन मग कार्यक्रम जाहिर केला जाईल.मतदान होईल व त्यानंतर मतमोजणी होऊन जो जिंकेल तो पुढील आमदार होईल.नवा आमदार साधारणपणे २६ नोव्हेंबरचे आत निश्चीत होईल. पण ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसापासुन अनेक इच्छुक उमेदवाराचें फलक झळकत आहे.विशेष म्हंणजे या फलकावर अनेकानीं आजच भावी आमदार म्हणवुन घेत मिरवायला सुरुवात केली आहे. पण या फलकामुळे नागरिकाचें मात्र मनोरंजन होत आहे.
  ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात यावेळी प्रथमच अनेक इच्छुक उमेदवाराचीं भाऊगर्दी पहायला मिळत आहे. विशेषत लोकसभा निवडणुकीत म.वि.आ.ला घवघवीत यश मिळाल्याने म.वि.आ.कडे उमेदवाराचीं संख्या जास्त आहे.
  यात विदयमान आमदार हिरामन खोसकर (कॉग्रेस) यांचेसह माजी आमदार सौ.निर्मला गावित (शिवसेना उ बा ठा गट), गोपाळा लहांगे, लकी जाधव, तुकाराम वारघडे, उषा बेंडकोळी, वैभव ठाकुर, डॉ.शरद तळपडे, श्रीमती अनिता घारे (सर्व कॉंग्रेस) आदीचीं नावे चर्चेत आहे.
  तर महायुतीकडुन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, शिवराम झोले, बाळासाहेब झोले, रविद्रं भोये आदीच्यां नावाचीं चर्चा सुरु आहे.
  दरम्यान प्रत्यक्षात ज्याच्या नशिबी आमदारकी असेल त्याला ती योग्यवेळी लाभेल.पण तोपर्यत स्वत:ला भावी आमदार म्हणवुन घेण्यात मात्र भलतीच चढाओढ सुरु असल्याचे दिसत आहे.
  सार्वजनीक ठिकाणी सण, समारंभ,वाढदिवस या निमित्ताने तथाकथित भावी आमदाराचें फलक दिमाखात झळकत असुन, सोशल मीडियावर ही सदरचे संदेश फिरत आहे.
  दरम्यान पहिल्यादांच ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघाला अर्धा डझन भावी आमदार लाभले असुन नागरिकाचें मात्र या निमित्ताने चांगलेच मनोरंजन होत आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी