शेख तय्यब यांच्यावर सर्वच क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव


बीड (प्रतिनिधी) - सायं. दैनिक बीड रिपोर्टर चे संपादक तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे भावी उमेदवार शेख तय्यब यांची आज दिनांक १० ऑक्टोबर २०२४ गुरुवार रोजी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अशासकीय सदस्य पदी निवड झाली आहे.
या निमित्ताने शेख अजहरुद्दीन, खतीब सय्यद मिनहाजुल आबेदिन, बीड जिल्हा परिषदेच्या योजना विभागातील सहाय्यक योजना अधिकारी खतीब सय्यद मिसबाहूल आबेदीन, सय्यद अदनान, मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, सय्यद आदिल आणि शेख लईख यांनी पुष्पगुच्छ देत पेढे भरवून हृदयी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या हातून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देण्याचे कार्य जास्तीत जास्त प्रमाणात आणि लवकरात लवकर व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी