माजी आमदार सौ.निर्मला गावित यांचा कॉंग्रेस प्रवेश ? कॉग्रेसच्या संभाव्य उमेदवार ?


ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन

  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघात पुन्हा: एकदा ट्विस्ट आला आहे. शिवसेना उ.बा.ठा गटाच्या उपनेत्या तथा माजी आमदार सौ.निर्मला गावित या म.वि.आ.च्या संभाव्य उमेदवार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली असुन, सौ.निर्मला गावित यांना कॉंग्रेस प्रवेशाचे आमंत्रण पक्षाकडुन दिले गेले असुन त्या कॉग्रेसकडुन पुन्हा एकदा रिंगणात उतरणार असल्याची दाट चर्चा सुरु झाली आहे.
  त्यामुळे सन २०१९ च्याच विधानसभा निवडणुकीच्या लढतीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. एकुणच पुन्हा एकदा विदयमान आमदार हिरामन खोसकर व माजी आमदार सौ.निर्मला गावित यांचेतच लढत होण्याची दाट शक्यता व्यक्त होते आहे.
  सन २०१९ चे ऐन विधानसभा निवडणुकीचे तोंडावर सलग दोन टर्म कॉंग्रेस पक्षाचे आमदार म्हणुन राहिलेल्या सौ.निर्मला गावित यांनी अचानकपणे कॉंग्रेस ला बाय करत शिवसेनेचा हात पकडला होता.तर कॉंग्रेस पक्षाला शेवटी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन हिरामन खोसकर यांचे रुपाने उमेदवार आयात करावा लागला होता.
  गावित विरुद्ध खोसकर या लढतीत खोसकरानीं बाजी मारत गावित यांचा पराभव केला होता.
  यावेळी पुन्हा; एकदा हे दोन्हीही प्रतिस्पर्धी आमने सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. मौजेची गोष्ट म्हंणजे हिरामन खोसकर हे कॉंग्रेस कडुन आमदार पद भोगुन पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत.तर सौ. निर्मला गावित या ही कॉंग्रेस या आपल्या मुळ घरी परतण्याची चिन्हे दिसु लागली आहेत.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी