ईगतपुरी तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहिणीस मिळणार मोबाईल ?काय आहे नेमका प्रकार,वाचा सविस्तर

ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन
   ईगतपुरी तालुक्यातील काही आदिवासी वाडी, वस्त्यांवर आपणासं मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतंर्गत मोबाईल संच मिळणार आहे असे सांगुन याेजनेतंर्गत लाभार्थी महिलाकडुन त्यांची कागदपत्रे घेतली जात आहे. यासह सबंधित महिलाचें मशिनवर थम्स(अंगठे) घेतले जात आहे.
  हा प्रकार ईगतपुरी तालुक्यातील पुर्व पट्टयात घडल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे ईगतपुरी तालुका अध्यक्ष पांडुरंग मामा वारुंगसे यांनी केला आहे.ते लाडकी बहिण योजनेचे ईगतपुरी तालुका सनियंत्रण समितीचे ही अध्यक्ष आहेत.
  दरम्यान या बाबतची अधिकृत तक्रार आली नसली तरी काही कथीत भामटयानीं लाभार्थी महिलानां सदरचे आमिष दाखवल्याची चर्चा आहे.
  शासनाकडुन लाडकी बहिण योजनेतंर्गत मोबाईल संच देण्याची कुठलीही योजना नसुन असा प्रकार घडल्यास वा अशा प्रकारचे आमिष कुणी दाखवल्यास तात्काळ गावातील सरपंच, पोलीस पाटिल वा सामाजिक कार्यकर्त्यानां कळवावे.व असल्या कुठल्याही आमिषाला बळी पडु नये असे आवाहन वारुंगसे यांनी केले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी