धानोरा महाविद्यालयाचा प्रथमेश माने कुस्ती स्पर्धेत राज्यात प्रथम


आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :    
       आष्टी तालुक्यातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेला प्रथमेश हनुमंत माने या विद्यार्थ्याने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये प्रथमेश माने याने ८६ किलो वजन गटात कुस्ती प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला . अधिक माहिती अशी की , धानोरा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेला प्रथमेश माने याने आतापर्यंत तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय कुस्तीमध्ये अनेक पारितोषिके मिळवले आहेत. दिनांक १५ ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या . या कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथमेश माने या खेळाडूने पुणे, जळगाव व कोल्हापूर येथील मल्लांना काही क्षणातच आसमान दाखवत प्रथम क्रमांक पटकावला . दिनांक १८ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे राज्याचा संघ निवडण्यात येणार असून , प्रथमेश माने हा २२ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये खेळणार आहे . प्रथमेश माने हा वारजे पुणे येथे कुस्तीचे धडे घेत असून , प्रथमेश चे वडील हनुमंत माने हे राष्ट्रीय कबड्डी चे खेळाडू आहेत. त्यांचे मार्गदर्शन प्रथमेश ला लाभत आहे . या मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भीमरावजी धोंडे , प्रशासन अधिकारी डॉ. डी बी राऊत, शिवदास विधाते, माऊली बोडखे, दत्ता गिलचे, प्राचार्य डॉ भगवानराव वाघुले, डॉ कैलास वायभासे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ सुभाष नागरगोजे, स्टाफ सेक्रेटरी प्रा निसार शेख, प्रा आजिनाथ गिलचे, प्रा ज्ञानदेव बोडखे, प्रा विवेक महाजन, प्रा गहिनीनाथ एकशिंगे, प्रा सुभाष मोरे, प्रा राजू शेलार, प्रा राजेंद्र मिसाळ, प्रा आतेश बनसोडे, प्रा सतीश तागड, प्रा डॉ संजय झांजे, डॉ उस्मानखान पठाण आदींनी अभिनंदन करून दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी