धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या अनुयायांसाठी टोल माफ कराण्याची मागणी - ऍड प्रकाश आंबेडकर


 मुंबई प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी दिनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौध्द धम्माची दिक्षा घेतली हा दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा मुक्तीचा दिवस आहे. दर वर्षी प्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हा सन साजरा करण्यात येतो, यावर्षी 12 ते 13 ऑक्टोंबर 2024 दरम्यान दिक्षा भूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी हा सन साजरी करण्यासाठी प्रवास करत असतात. एवढ्या मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सन असताना त्यांच्याकडून टोल वसूल केला जातो. महाराष्ट्र आणि देशभरातील ग्रामीण भागातून लोक येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करत असतात. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी कडून मागणी करतो की, आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौध्द अनुयायांसाठी आकारण्यात येणारा टोल माफ करावा कृपया आपण त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. वंचित बहुजन आघाडी ने एका निवेदनाद्वारे केली आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी