ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघ वार्तापत्र,महायुती मध्ये जागेसाठी रस्सीखेच झाली सुरु?


ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन:-
   ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विदयमान आमदार हिरामन खोसकर यांचेसह ईगतपुरी त्रंयबकेश्वर तालुक्यावर मोठी पकड असलेले दिग्गज नेते कॉंग्रेस व शिवसेना उ.बा.ठा.ला बाय बाय करत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये सामील झाल्याने महायुतीची ताकद दुपटीने वाढली आहे.महायुतीसाठी हा चांगला संकेत असला तरी या जागेवर प्रारंभापासुन दावा ठोकुन बसलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे व पक्षातील इच्छुक असणार्याचें टेंशन वाढले आहे.
  दुसरीकडे या दिग्गज स्थानिक नेत्याच्यां प्रवेशाबाबत महायुतीतील घटक पक्षातील काही कार्यकर्त्यानीं तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.
  ईगतपुरी तालुक्यातील स्थानिक राजकारणात माजी आमदार शिवराम झोले, सहकार क्षेत्रावर वर्चस्व राखुन असलेले अँड.संदिप गुळवे, माजी जि.प.सदस्य गोरख बोडके, जनार्दन माळी, संपतराव काळे, पांडुरंग मामा शिंदे आदीसह अनेक दिग्गज स्थानिक नेते व त्यांचे समर्थक कार्यकर्ते विविध पक्षातुन आता एकाच जागी एकवटले असुन सीमीत असलेली रा.कॉ.ची ताकद तालुक्यात दुपटीने वाढली आहे.
  त्रंबकेश्वर तालुक्यातही संपत नाना सकाळे हे कॉंग्रेस पक्षातील एक मोठं नाव.माजी जि.प.उपाध्यक्ष, मजुर फेडरेशन व सहकारावर त्यांचे निर्विवाद आहे.त्यांच्या जाण्याने त्रंयबकेश्वर तालुक्यातील कॉंग्रेस पक्षापुढे अस्तित्वाचे प्रश्नचिन्ह उभे राहिले.
  हे सगळेच वेगवेगळय़ा पक्षात कार्यरत असलेले दिग्गज एकाच ठिकाणी एकवटल्याने महायुती निदान याक्षणी तरी भक्कम झाल्याचे दिसत आहे.
  विदयमान आमदार हिरामन खोसकर यांनी आता या जागेवर दावा ठोकला आहे.महायुतीचे राज्यसभा सदस्य निवडुन आणणेसाठी आमदार हिरामन खोसकर यांनी स्वत:ची आमदारकी पणाला लावल्याने त्यांच्या या त्यागाची कदर व्हावी असा दावा खोसकर समर्थक खाजगीत करत आहेत.या जागेसाठी आता खुद्द ना.छगन भुजबळ यांनी प्रयत्न करावे यासाठी साकडे घालण्यात आले आहे.
  तर दुसरीकडे या जागेवर दावा ठोकणार्या शिवसेनेची कोंडी झाली असल्याचे चित्र आहे. शिवसेनेत दोन्ही तालुक्यात तितकेसे दमदार स्थानिक नेतृत्वाची उणीव असल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे.या मुळे खोसकर यांचे येण्याने शिवसेनेची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस ला जाण्याची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
  लोकसभा निवडणुकीत आमदार हिरामन खोसकर व त्यांचे सोबतचे दिग्गज नेते म.वि.आ.त होते.त्यावेळी या मतदारसंघातुन त्यांनी शिवसेना उ बा ठा चे राजाभाऊ वाजे यांना निवडुन आणण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.या मताधिक्क्याचाही आता हवाला देत रा.कॉ.ने या जागेवर दावा ठोकला आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी