गोदावरी स्वच्छता अभियान दक्षिण कशी पैठण प्रतिष्ठान नगरी


गंगा सेवेचा महिमा व गरज जाणून शेवगाव मार्केट चे हमाल, मापाडी आणि व्यापारी मंडळी यांनी सहभागी होऊन विशेष योगदान

{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज सेवा संस्थान आखेगाव 
विविध भक्ती पीठे व परिसरातील भाविकभक्तांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला चार वाजेपासून किमान दोन तास गंगा स्वच्छता अभियान राबवून नंतर पारंपरिक पद्धतीने कीर्तन सेवा, जागर ,काकडा, घराघरातून आणलेला खिचडीचा प्रसाद होत असतो कालची अश्विन शुद्ध एकादशीची सेवा 19वी होती त्याकरिता मागील वर्षाच्या संस्कारातून भातकुडगाव येथील श्रीमद् भागवत शताब्दी प्रसादिक मंडळ आणि तोंडोळी तालुका पाथर्डी येथील रेणुका माता भक्त परिवार यांनी गेल्यावर्षीप्रमाणेच सेवेचा स्वीकार करून अनेक बांधवांच्या सहभागातून सेवा केली .
यावर्षी त्यामध्ये गंगा सेवेचा महिमा व गरज जाणून शेवगाव मार्केट चे हमाल, मापाडी आणि व्यापारी मंडळी यांनी सहभागी होऊन विशेष योगदान दिले सर्व व्यापारी मंडळींनी मार्केट बंद ठेवून सेवेला येण्याचे मान्य केले फराळ प्रसादाचीही सेवा केली. आपण हे दृश्य फोटोच्या द्वारे पाहू शकतो की आलेला मनुष्य अत्यंत आत्मीयतेने स्वतःची प्रतिष्ठा विसरून भंगीपणाचे काम करत असतो आपल्या संस्कृतीमध्ये शेवेला फार महत्त्व आहे. गंगा मातेला ,संतांना ज्यांच्याकडून सेवा घ्यायची त्याच भाग्यवानांना गंगामाता बोलावते दिवसेंदिवस कीर्तनातून होणारे प्रबोधन लोक गंगेमध्ये जी कपड्यांची घाण टाकत होते ती कमी झाल्याचे जाणवते म्हणून लवकरात लवकर स्वच्छतेचे कार्य पूर्ण होते. 
अमोल बाबर पैठण आणि बाबुराव डोईफोडे पाटेगाव यांनीही सेवाभावाने आपले ट्रॅक्टर दिल्यामुळे एकदम वाळवंटातील घाण उचलली गेली त्यांना धन्यवाद 
आलेला सहभागी भाविक जाणतेपणाने लोकांना प्रबोधन करत असतो आलेल्या सर्व भाविकांना धन्यवाद शेवगाव मार्केटचे सर्व व्यापारी हमाल मापाडी मंडळी आल्यामुळे सर्व भाविकांना एक नवीन आकर्षण वाटले. याकरिता रामजी हरिदास वडूले यांनी खूप तडजोड केली.



 
आणखीन एक गमतीचा भाग की रात्री बारा वाजेपर्यंत जागराचे भजन होऊन वारकरी मंडळी वाळवंटामध्येच झोपत असतात रात्री दोनच्या दरम्यानच पाणी सुटल्यामुळे वाळवंटामध्ये झोपलेल्या वारकरी मंडळींच्या खाली पाणी आले आणि एकच धावपळ उडाली घाटावर आलोत काही काळातच दोन फुटाने पाणी कीर्तनाच्या जागेवर वाढले. थोडक्यात अनर्थ टळला असेच म्हणावे लागेल गंगा माता अनर्थ कशी घडू देईल. ~ राम महाराज झिंजुर्के जोग महाराज संस्थान आखेगांव ता. शेवगांव

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी