अमोल शेरकर यांच्या नेतृत्त्वाखाली तहसीलवर मातंग समाज अधिकार मोर्चा

 
माजलगाव प्रतिनिधी /
माजलगाव मतदार संघातील मातंग समाजाच्या विविध मागण्या संदर्भात माजलगाव तहसील कार्यालयावरती युवा नेते अमोल शेरकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांचा मोर्चात धडकल्याचे दिसून आले
 सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावा याबरोबरच मातंग समाज हा अतिशय उपेक्षित असल्याने त्याचे वर्गीकरण करून त्याला न्याय मिळवून देण्यासंदर्भात शासनाकडून अ ब क ड करण्यात यावे तसेच महाराष्ट्रात अस्तित्वात असलेले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाला कायमस्वरूपी चेअरमन देऊ रिक्त जागा भरण्यात यावे व ज्या लाभार्थ्यांनी आजपर्यंत कर्ज घेतले आहे त्या सर्वांचे कर्ज माफ करण्यात यावे याबरोबर गायरान धारकांच्या ताब्यात असलेल्या जमिनी कायमस्वरूपी नावे करून देण्यात यावीत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी तालुकास्तरावर वस्तीग्रह निर्माण करून मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्यासंदर्भात माजलगाव तहसील कार्यालय वरती दिनांक 11 10 2024 रोजी मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात माजलगाव, वडवणी, धारूर या परिसरातून महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला या मोर्चाचे नेतृत्व अमोल शेरकर यांनी केले हा मोर्चा आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौकातून छत्रपती संभाजी राजे चौक आणि नंतर तहसील कार्यालयावर धडकला या मोर्चाला पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त चोख देण्यात आला होता या मोर्चाचे निवेदन तहसिलदार साहेब यांनी स्वीकारले.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी