आशिष अशोक भालेराव यांची आजाद समाज पार्टी काशीराम च्या केज तालुका प्रमुख पदी निवड



केज प्रतिनिधी :-बीड जिल्ह्यातील केज तालुका या ठिकाणी कार्यक्रमावेळी आशिष अशोक भालेराव यांची आजाद समाज पार्टी कांशीराम चे बीड जिल्हाध्यक्ष आशिषकुमार चव्हाण यांच्या हस्ते केज तालुका प्रमुख म्हणून निवड करण्यात आली या प्रसंगी आजाद समाज पार्टी कांशीराम च्या शाखेचेही अनावरण प्रमुख उपस्तित पाहुणे व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आशिषकुमार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले कार्क्रमाला प्रमुख उपस्तिती मधे आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक तथा उत्तम व्याख्यान कार सिद्धार्थ शिनगारे हे ही होते तसेच पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीचे प्रमुख पदाधिकारी ही उपस्तीत होते .कार्यक्रमा प्रसंगी आशिष भालेराव यांना केज तालुका प्रमुख पदाचे नियुक्ती पत्र देऊन आजाद समाज पार्टी कांशीराम बीड समस्त बहुजन समाजासाठी व तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्या साठी राष्ट्रीय अध्यक्ष तथा भीम आर्मी चीफ खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा कार्यकारणी सदैव तयार असेल आजाद समाज पार्टी कांशीराम शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष असून तो अन्याया विरुद्ध सदैव उभा राहणार असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष आशिषकुमार चव्हाण यांनी केले व पुढील कार्यासाठी भालेराव यांना शुभेच्छा दिल्या, तसेच या वेळी प्रमुख उपस्तिती असलेले पाहुने सिद्धार्थ शिनगारे सर यांनी उपस्तितांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले की आंबेडकरी चळवळ ही रक्ताने नसून विचाराने सक्षम असते आजाद समाज पार्टीचा चा प्रत्येक कार्यकर्ता हा आंबेडकरी चळवळ सक्षम करण्यासाठी तो स्वतःहा ही सक्षम व्हायला हवा खासदार भाई चंद्रशेखर आजाद हे देशातील अन्यायाने पीडित दिन दलित समाजाला लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम हे तेवढ्याच सक्षम पणे करत आहेत असे मौलिक मार्गदर्शन या वेळी त्यांनी केले.कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनीही भालेराव यांना मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या, शुभेच्छा ना उत्तर देताना नवनियुक्त केज तालुका अध्यक्ष आशिष भालेराव यांनी आजाद समाज पार्टी केज तालुक्यातील प्रत्येक गावा गावात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणार असे प्रतिपादन केले.या वेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख उस्मान, बीड तालुका अध्यक्ष अशोक(मायकल) वाघमारे,गेवराई तालुका अध्यक्ष सय्यद इनाम इनामदार,प्रवक्ता जावेद कुरेशी, ऍड.सदानंद वाघमारे, बीड तालुका उपाध्यक्ष रेहान शेख,माळेगाव ग्रामपंचायत चे संरपंच रुपसेन( बाप्पू) गव्हाणे,कापील जी मस्के,राहुल जी व्हाहुळे, अच्युत भालेराव,धनराज भालेराव,भारत भालेराव,महादेव चाळक ,करण भालेराव,अक्षय भालेराव, अजय भांगे,शेख साहेब,खतीब साहेब,तात्या दहातोंडे,बबिता नाईकवाडे, दैवशाला भालेराव,शिंदे मॅडम,आकाश भालेराव,सुरेश भालेराव,दयानंद भालेराव,चेतन मस्के आदी ग्रामस्थ उपस्तीत होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी