सह आयुक्त नगरपरिषद प्रशान, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या लेखी पत्र दिल्यामुळे तुर्त आमरण उपोषण स्थगित -आगळे सर


छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांचे शोषण होऊ नये म्हणून त्यांच्या हितासाठी केलेल्या कामगार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून हजारो कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवून शोषण करता जमातीने साखळी पद्धतीने टारगेट भ्रष्टाचारातून केलेल्या लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार घोटाळ्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी मा विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर या कार्यालयासमोर दिनांक 14 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी सकाळी ११: ३० आमरण उपोषणाला संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी सुरुवात केली होती . मंगळवार दिनांक १५ आक्टोंबर २०२४ रोजी दुपारी ०३: ३५ वा. लेखी पत्र दिल्यामुळे सलग दोन दिवस सुरू असलेले आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कामगार नेते गौतम आगळे सर यांनी कळविले आहे.
       याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड नगर परिषदेसह सर्व जिल्हातील नगरपरिषद / नगरपंचायत विभागात दिनांक 1 जानेवारी 2011 ते आजतागायत दलित बहुजन समाजातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देता अत्यंत तुटपुंजा पगार रोख स्वरूपात देऊन त्यांचा ई.पी.एफ व ई.एस.आय.सी न भरता कामगार कायद्याचे उल्लंघन करून लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार घोटाळा करून कंत्राटी कामगारांचे शोषण केल्याप्रकरणी सर्व कागदपत्राची तपासणी व सखोल चौकशी करून मुख्याधिकारी नगरपरिषद / नगरपंचायत चे संबंधित कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कामगार कायद्यातील तरतुदीनुसार कंत्राटी कामगारांचा हडप केलेल्या पगारातील फरक कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम व्याज अधिक दंडासहित वसूल करून कष्टकरी कंत्राटी कामगारांचे हक्काचा मेहनताना त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करावा यासाठी दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी मा . विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर कार्यालयासमोर रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली तर केंद्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक भाई चैनदास भालाधरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाई राजेशकुमार जोगदंड सकाळी ११: ३० वा आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. बीड नगर परिषदेसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत व महानगरपालिका विभागात कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत आहे की नाही, ई पि एफ व ई एस आय सी ची स्लिप कंत्राटी कामगारांना देण्यात येते किंवा नाही याची तपासणी करून तसा अहवाल मा आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना दिनांक ३० आक्टोंबर २०२४ पर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर कार्यालया समोरील आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले, असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी कळविले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी