इंटरनॅशनल अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये आर्यन रत्नदीप सानप आणि सक्षम रत्नदीप सानप यांना सर्वोत्तम मास्टर अबॅकस चॅम्पियन व्यक्तिमत्व -स्पर्धक



आर्य सानपला चॅम्पियन ऑफ द मोमेंटो चॅम्पियन ट्रॉफी आणि सायटेशन

   सक्षम सानपला सर्वोत्कृष्ट जागतिक चॅम्पियनअबॅकस स्पर्धक मानद साईटेशन आणि ट्रॉफी

बीड (प्रतिनिधी) आर्यन सानप आणि सक्षम सानप यांना जागतिक स्तरावर यशस्वी स्पर्धक बनवण्यामध्ये त्यांच्या पालकांचे आहे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळेच त्यांनी "अबॅकसमुळे आर्यन सानप आणि सक्षम सानपच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि सर्वोत्कृष्ट बौद्धिक व्यवहारिक , कलात्मक, समन्वयक असा सर्वोत्तम विकास झालेला आहे असे वडिलांचे आणि आईचे आनंदप्रिय असे गौरव उद्गार आहेत" . 
जागतिक स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये तसेच शालेय स्तरावरील सर्वांगिन विकास करण्याच्या मार्गाने 22 देशांपेक्षा जास्त सहभाग असणाऱ्याया आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेद्वारे अबॅकस चॅम्पियन ऑगस्ट 2024 या कालावधीत तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सिलेक्शन करण्यात आलेले होते. सर्व टप्प्यांमध्ये आर्यन सानप आणि सक्षम सानपने अबॅकसमध्ये आऊट ऑफ रँकिंग मिळवून प्रथम क्रमांक रशिया, कजाकिस्तान, तर्की, दुबई, यूएसए, यु अँड इ भारतासह, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, श्रीलंका, न्युझीलँड, पनामा, इंडोनेशिया अशा जगातील दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपैकी सहभाग असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आर्यन सानप आणि सक्षमने सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळवल्यामुळे त्याची रशिया, दुबई तसेच बेंगलोर येथे नोव्हेंबर 2024 महिन्या होणाऱ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन जागतिक अबॅकस ओलंपियाडसाठी सुद्धा निवड करण्यात आलेली आहे. आर्यन सानप आणि सक्षम सानप स्पर्धेमधील प्रश्न फक्त पाच ते सात मिनिटांमध्ये अगदी बरोबर सोडवून 100% पैकी मार्क्स मिळवून ऐतिहासिक विक्रम केलेला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून सतत प्रयत्न करत असल्यामुळे त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी सतत योग्य ते मार्गदर्शन करून यश प्राप्त करण्यास सहकार्य केलेली आहे. अबॅकस तथा वैदिक गणित मार्गदर्शक डॉ.एस ए घोडके यांनी त्यांना सतत गणिता मधील असलेल्या अडचणी दूर करण्यास प्रयत्न केलेले आहे. अबॅकस स्टडी सेंटरचे प्रमुख डॉ. घोडके एस ए. अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजातील सर्व स्तरांमधून आर्यन सानप आणि सक्षम सानपचे, आई-वडिलांचे हार्दिक अभिनंदन होत असून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. आर्यन सानप आणि सक्षम सानप यांची दुबई किंवा टर्की या देशांमध्ये होणाऱ्या जागतिक स्तरावरील नोव्हेंबर 2024 जागतिक ऑफलाइन अबॅकस ओलंपियाड निवड झालेली आहे असे जिल्हा अबॅकस वितरक एस. ए. घोडके यांनी सांगितले.

अबॅकस आणि वैदिक मॅथमुळे विद्यार्थ्यांचा गणितामधील आवड निर्माण होऊन गणिताबद्दलची मनात असलेली भीती नष्ट होऊन अनेक क्लिष्ट अशा गणितीय पद्धती सोप्या पद्धतीने सोडवल्यासाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, स्मरणशक्ती यांचा विकास करण्यासाठी अबॅकसचा उपयोग केला जातो असे जिल्हा अबॅकस वितरक घोडके एस ए यांनी सांगितले आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी