मी शेवगावकर चा दणका मोडला हजारो कोटींचा चुना गुतंवणूकदारांना लावून पळुन गेलेल्या आणि अटक झालेल्या बिग बुल आणि त्यांच्या चेल्या चपाटयाचा मणका


जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्जाला फेटाळून लावत आरोपींचा तुरुंगातला मुक्काम वाढवला अहमदनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला आणि त्यांचे सहकारी ॲक्शन मोडमध्ये E. O. W. शाखा {आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग } करणार एम.पी.आय.डी. कायद्याअंतर्गत हवालामार्फत रोखीने पैसे जमा केल्यामुळे कठोर कारवाई होणार?

{अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

 या बाबत सविस्तर वृत्त असे की अखेर शेवगाव तालुक्यातील शेअर्स मार्केटच्या बिग बुल्सवर एम. पी.आय.डी. अंतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे व त्याना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्जाला फेटाळून लावत तुरुंगातला मुक्काम वाढवला आहे शेवगाव तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या हजारो कोटी रुपयांचा शेअर्स ट्रेडिंग च्या नावाखाली लूटमार करणारे 1) शिवटेक सोलुशन कुरुडगाव चे ट्रेडर आरोपी नामें
न्यानेश्वर भाऊसाहेब कवडे व भाऊसाहेब कवडे 2) वेल्थ मेकर नजीक बाभूळगाव तालुका शेवगाव चे ट्रेडर वंजारी रामेश्वर शिवाजी ज्ञानेश्वर शिवाजी वंजारी व शिवाजी कचरू वंजारी 3) एन के मास्टर कुरुडगाव तालुका शेवगाव चे ट्रेडर नारायण रामनाथ काळे किरण रामनाथ काळे यांच्यासर्वावर एम पी आय डी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्या कामी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी विशेष प्रयत्न केले वरील आरोपींनी माननीय जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला होता परंतु त्यामध्ये फिर्यादीच्या वतीने माननीय सरकारी वकील त्यांच्याबरोबर अँड सचिन गुजाबा आघाव अँड प्रवीण पालवे यांनी काम पाहिले वरील आरोपीवर एम. पी. आय.डि. या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे व
त्याना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्जाला फेटाळून लावत तुरुंगात मुक्काम वाढवला आहे गंतवणूकदारांच्या वतीने माऊली धनवडे जिल्हा युवा सेना तालुका उपप्रमुख नंदू भाऊ मुंडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सुभाष आंधळे चेअरमन सोने सांगवी सोसायटी किसनराव झुंबड चेअरमन राक्षी सेवा सोसायटी मनोहर कातकडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव राजेंद्र दोरके चेअरमन राक्षी धनंजय जाधव संजय जोशी देवा गदेवाडी यांनी विशेष प्रयत्न केले आमरण उपोषणही केले त्यात एडिशनल एस पी श्रीयुत प्रशांत खैरे साहेब यांनी एम. पी.आय.डी. चा शब्द दिल्याप्रमाणे पाळला तरी सर्व गुंतवणूकदारांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. शेवगांव शेअर मार्केटच्या अटक झालेल्या बिग बुल्सनी आपल्या खात्यातून ऑनलाईन खोटे व फसवणुकीचे { हवाला रोखीचे } व्यवहार केले त्यावर आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर कठोर कारवाई करणार आहे. फक्त फसवणूक झालेल्या हजारो लोकांनी विहित नमुन्यात अर्ज केले व पुरावे सादर केले संबंधित बिग बुल्स नी SEBI सेबीची परवानगी आय.टी.आर. रिटर्न्स भरले नाहीत यामधून सवलत कशी मिळाली? मोठ्या प्रमाणात झालेल्या रोख आर्थिक देवान घेवान गुंतवणूकदारांकडे लाखो रुपये कुठून आले ? त्याचा त्यांनी शासनाला हिशोब सादर केला होता का ? शेअर मार्केच्या नावाखाली फसवणूकीची अनेक प्रकरणे आपल्या तालुक्यात घडली आहेत घडत आहेत मुंबई EOW मध्ये एकुण आर्थिक गुन्ह्यांच्या तपास अनेक फर्जी स्कीम गुन्ह्यांचा तपास या कायद्या अंतर्गत लागला आहे. अशा गुन्ह्यांचा तपास खालील दोन कायद्यान्वये केला जातो.१. Maharashtra Protection of Depositors Interest Act-1999 ( State Act) 2. Banning of Unregulated Deposits Schemes Act- 2018. ( Central Act). आपल्या शेवगांव तालुक्यातील सर्व गुन्हे या कायद्याखाली येतात. 
  Section 3 and 5 define offences, whereas punishment is as per section 21 and 23 in " The Banning of unregulated deposit schemes Act. 
 Section 31 empowers Police station incharge to register offence, take searches, arrest accused and conduct investigation with prior permission of concerned DCP/ SP.
या कायद्या अंतर्गत कारवाई केल्यास लोकांचे पैसे बुडविणारना चांगलाच धडा मिळेल 

 
 युरोपच्या फोरेक्स मार्केटमध्ये ऑनलाइन अहवालाचा पैसा गुंतवल्या भारताचे परराष्ट्रीय खाते ईडी इन्कम टॅक्स फॉरेन फंडिंग बोगस कंपनीच्या खात्यांमधून संशयास्पद व्यवहार केल्याने सक्तवसुली संचालनालय { ई.डी. } आणि आयकर विभाग { Income Tax Dept.} यांच्या रडारवर अनेक राजकारणी मोठे व्यावसायिक तलाठी ग्रामसेवक प्राथमिक शिक्षक पोलीस प्रशासनातील कर्मचारी अधिकारी बिल्डर दोन नंबरचे व्यावसायिक हवाला मनीचे व्यवहार करणारे सगळ्यांवरच टांगती तलवार हम तो डुबेंगे सनम साथ में तुमकोभी ले डुबेंगे करायला गेला गणपती झाला मारोती 


{ क्रमशः }

फरार झालेल्या भामट्या बिग बुलस ना भीक घालू नका त्यांच्या ऑनलाइन धमक्या आरेरावीची भाषा आणि मगरुरी सहन करू नका तुमचा हरणाच्या शिंगाला बांधलेला पैसा परत हवा असेल तर ठोस कायदेशीर कारवाई केल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही या सर्व भामट्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असलेले सर्व खाती गोठविण्यात येतील मग हे मंदिराबाहेर भीक सुद्धा मागु शकणार नाहीत


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !