ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर याजकडुन

   ईगतपुरी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उ.बा.ठा शिवसेनेला सोडला जावा अशी आग्रही मागणी उ.बा.ठा. शिवसेनेच्या त्रंयबकेश्वर तालुका प्रमुख समाधान बोडके पाटिल यांनी केली आहे.
  ईगतपुरी विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता व तो आजही आहे.सन १९९९ ते २००९ या काळात या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व शिवसेनेने सलग दहा वर्ष केले होते.या शिवाय नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत ही उ.बा.ठा.चे राजाभाऊ वाजे यांना या मतदारसंघातुन विक्रमी आघाडी मिळाली आहे.
  हा मतदारसंघ सध्या कांग्रेसकडे आहे.मात्र नुकत्याच आटोपलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले व विद्यमान आमदार हिरामन खोसकर यांचेत रंगलेल्या कलगीतुर्याचा विपरीत परिणाम होणार आहे.तसेच ईगतपुरी तालुक्यातील कांग्रेसचे प्रबळ नेते अँड.संदिप गुळवे यांनीही समर्थकासह उ.बा.ठा त प्रवेश केल्याने आमची ताकद मोठया प्रमाणावर वाढल्याचा दावा ही बोडके पाटिल यांनी केला आहे.
  महायुतीतंर्गत ही जागा जवळपास शिंदे शिवसेना गटाला सुटण्याची शक्यता असुन त्यांना टक्कर देऊन अस्सल शिवसेना ही उ.बा.ठा च आहे हे दाखवुन देण्यासाठी स्थानिक पातळीवर शिवसैनिक उत्साहित असुन शिंदे गटाला लोकसभेप्रमाणेच औकात दाखवु असा दावा ही बोडकेनीं केला आहे.
  दरम्यान लवकरच ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकाचें शिष्टमंडळ पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या भावना त्यांचेकडे मांडणार असुन या जागेचा आग्रह धरणार असल्याची माहितीही बोडके यांनी दिली आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !