शिवरायांच्या मालवण येथील पुतळा निर्मात्याची सखोल चौकशी व तात्काळ कारवाई करा वंचित बहुजन महिला आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

   

 ब्रह्मपुरी प्रतिनिधी -  वंचित बहुजन महीला आघाडी तर्फे  उपविभागीय अधिकारी पवर्णी पाटील मॅडम, यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा लिंना रामटेके यांच्या मार्गदर्शाना रवाली निवेदन सादर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आठ महिन्यानंतरच कोसळला आहे.पुतळा नेमका कशामुळे कोसळला आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळल्यामुळे सगळीकडे नाराजी व्यक्त होत आहे. या झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा लिना रामटेके यांच्या मार्गदर्शानाखाली वंचित बहुजन महीला आघाडीच्या कार्यकर्त्यां यावेळी निवेदन देतांना लता मेश्राम, निरू खोब्रागडे,सुप्रिया तलमले, कल्पना तिवाडे जिजाऊ ब्रिगेड,अमेया पारधी,योगेशवरी दोनाडकर, स्वाती चौधरी,चंदा माटे,वंदना कांबळे,डिंपल तलमले, राणी चौधरी,मनिषा तलमले, व इतर कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !