मुख्याधिकारी नीता अंधारे मॅडम आमरण उपोषण करते महादेव गायकवाड यांचा जीव वाचवा:- पॅंथर नितीन सोनवणे

 

बीड शहरामध्ये नगर परिषदेच्या समोर दिनांक 09/09/2024 रोजी पासून महादेव शामराव गायकवाड हे आमरण उपोषण करत आहेत आज 4 दिवस झाले तरीसुद्धा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने येऊन त्यांचं आंदोलन सोडलेलं नाही..

आज ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या सर्व टीमला सोबत घेऊन नगरपरिषद या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आंदोलन करते त्यांची भेट घेऊन संघटनेच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दिला व सीओ निता अंधारे मॅडम यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे..

आंदोलनकर्त्यांचे वडील शामराव मारुती गायकवाड यांनी द्वारकादास मंत्री बँकेकडून 40000 रुपये कर्ज घेतले होते ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या उत्पादन व इतर रकमेतून 75530 रुपये नगर परिषदेने 2003 साली ला कपात करून घेतले पण वसुली अधिकारी मोरे यांच्या सांगण्यावरून तब्बल पाच वर्ष द्वारकादास मंत्री बँकेला पाठवले नाही त्यामुळे आज 307000 रुपये बाकी राहिली म्हणून त्यांचे SBI खाते होल्ड केले आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या बँकेस व नगरपरिषदेला विचारणा केली असता उडवाउडचे उत्तर देत असून ही बाब गंभीर आहे त्यामुळे त्यांनी हे आमरण उपोषण केले आहे जोपर्यंत नगरपालिका व बँक या बाबतीत काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील असं उपोषणकर्त्यांनी सांगितलं आहे. 

आंदोलनाच्या काळात त्यांच्या जीवदास काही धोका झाल्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील. ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने सीओनिता अंधारे यांना विनंती करत आहोत तात्काळ लेखी स्वरूपाचं लेटर देऊन आंदोलन थांबवा व आंदोलन कर्त्याचा जीव वाचवा अन्यथा पॅंथरच्या वतीने व आंदोलनकर्त्यांना सोबत घेऊन नीता अंधारे यांच्या तोंडाला काळे फासले जाईल. असा इशारा नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना, तालुकाध्यक्ष कावेरी जाधव, तालुका उपाध्यक्ष निसार शेख, युवा शहराध्यक्ष अविनाश वाडमारे, उमेश तारीख सोशल मी शहराध्यक्ष, मिश्रीलाल जंगडा शहर सचिव, सोनी जंगडा सचिव शहर, दीक्षा मीरपगार शहर उपाध्यक्ष, पापा भाई तालुका सचिव, रोहित सोनवणे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !