बीड शहर बचाव मंचच्या दणक्यामुळे बीड न.प. कडू थातूर मातुर कामे सुरू




 बीड प्रतिनिधी- बीड शहर बचाव मंचाने दिलेल्या दणक्यानंतर मुख्य अधिकारी नीता अंधारे यांना मुख्यअधिकारी पदावर कार्यरत असल्याची व त्याची काही कर्तव्ये असतात याची अचानक आठवण झाली. मग आता त्या तरी कशा मागे राहतील...? कुठल्यातरी वर्तमानपत्रांमध्ये बातमी लावून सांगून टाकलं की दोन-तीन दिवसांपासून जी सफाईची मोहीम चालू आहे ती फक्त नगरपालिकेच्या यंत्रणेमार्फतच चालू आहे. ही श्रेय लाटण्याची स्पर्धा करताना यांना लाज वाटायला पाहिजे. कोणी फोटो काढतो कोणी वर्तमानपत्रात बातमी छापतो, जनतेच्या अतिगंभीर होत चाललेल्या प्रश्नांची कदर खरंचच या सर्वांपैकी कोणाला तरी आहे का....? फोटो सेशन करणारे  नेते इतके दिवस कुठे होते, आता कसे काय सक्रिय झाले?? यांना दोन दिवसापूर्वी रात्री अचानक साक्षात्कार झाला की बीड शहरांमध्ये नगरपालिका नावाची संस्था आहे, बीड शहरातील जनतेचे प्रश्नही गंभीर होत आहेत ते सुटायला पाहिजेत. आणि सकाळी उठून ते लगेचच कामाला लागले. असा चमत्कार कसा काय घडला असा प्रश्न बीड शहरातील प्रत्येक भागातील, गल्लीबोळातील नागरिक विचारत आहेत. नाल्या, रस्त्यांवरचे कचऱ्याचे ढिगारे साफसफाई, स्वच्छता करणे हे तर गरजेचे आहेच परंतु कचऱ्याची  व्यवस्थितपणे कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना व पावले उचलण्याची गरज आहे. नळाला पाणी देखील आठवड्यातून किमान एक वेळेस,कधी जमेल तेव्हा सणवार पाहुन दोन वेळेस देणे गरजेचे आहे. त्यानंतर बाकीची विकास कामे व इतर खुप गोष्टी विकासाच्या अनुशेष स्वरूपात बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित पडलेले आहेत.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !