मुगगाव ग्रामपंचायत नरेगा कामात महाभ्रष्टाचार चौकशी करून कारवाई करावी माजी सरपंच संजय खोटे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार


पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यातील मुगगाव ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणावर मग्रारोहयाचे कामे सुरू असुन ते कामे मजुराने न करता मशिनद्वारे केली जात असताना कामावर मजूरांच्या ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक ऑनलाइन हजरी भरून घेतात कशी यांची लेखी तक्रार व निवेदन देऊन चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड,मुख्य कार्यकारी अधिकारी बीड व गटविकास अधिकारी यांच्याकडे माजी सरपंच संजय खोटे यांनी केली आसुन सन 2013 ते सन 2017 पर्यंत तेरावा वित्त आयोगाअंतर्गत पवनचक्की कर तसेच केकानवस्ती अंतर्गत पाणीपुरवठा योजना, महादेव दरा पाईपलाईन इत्यादी कामे न करता पैसे उचलेले असल्याने मुगगाव ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या महाभ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी नसतात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच संजय खोटे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !