लेखक नवनाथ गायकर यांच्या जिमीन या कथेस प्रतिभा साहित्य संघाचा प्रथम पुरस्कार जाहिर

ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन

  नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिध्द ग्रामीण साहित्यीक नवनाथ अर्जुन पा. गायकर यांच्या जिमीन या कथेस अकोट तालुका, जि.अकोला या विदर्भातील ख्यातनाम प्रतिभा साहित्य संघाचे वतीने आयोजीत "उत्सव पीक पाण्याचा" यातंर्गत कथा स्पर्धेत प्रथम क्रंमाक मिळाला असल्याची माहिती प्रतिभा साहित्य संघाचे अध्यक्ष तथा स्पर्धेचे आयोजक विशाल कुलट व सचिव सागर तळेकर यांनी प्रसिद्धि पत्रकान्वये दिली आहे.
  या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातुन तब्बल २८७ कथा आलेल्या होत्या. यातुन गायकर यांच्या कथेस प्रथम स्थान मिळाले आहे.
  पत्रकार, लेखक व किर्तनकार म्हणुनही प्रसिद्द असलेल्या नवनाथ अर्जुन पा. गायकर यांना कथा व कविता लेखनात या पुर्वीही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
  सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दि. २३ सप्टेंबर रोजी अकोट, जि.अकोला (विदर्भ) येथील वसुंधरा माध्यामिक विदयालयात सायं.७ वा.आयोजीत करण्यात आला आहे.
  दरम्यान गायकर यांच्या या यशाचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र सह विविध साहित्यीक संस्था,पत्रकार संघ,साहित्यीक मान्यवर व अनेकविध मान्यवरानीं हार्दिक अभिनंदन केले आहे.


वाचन चळवळीसाठी असे उपक्रम उपकारक - गायकर
-
   प्रतिभा साहित्य संघाचा उपक्रम स्तुत्य आहे.महाराष्ट्र भरात अशा विविध साहित्य संस्था, साहित्यीक वाचन, लेखन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी अविश्रांत धडपड करत असतात.हया चळवळी उपकारक आहे.
  शासनाने या अशा संस्थानां अनेकविध मार्गाने प्रोत्साहित करण्याची गरज आहे.
-नवनाथ अर्जुन पा. गायकर
लेखक

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !